जाहिरात

Ahmedabad Plane Crash: मुलाला वाचवण्यासाठी आगीची पर्वा न करणारी आई, 'हा' Video पाहून अंगावर येईल काटा

Ahmedabad Plane Crash Update : हे विमान अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये कोसळले, त्यावेळी सीता पाटणी नावाच्या या महिला त्यांच्या मुलासोबत अपघातस्थळी उपस्थित होत्या.

Ahmedabad Plane Crash: मुलाला वाचवण्यासाठी आगीची पर्वा न करणारी आई, 'हा' Video पाहून अंगावर येईल काटा
Ahmedabad Plane Crash Video : या व्हिडिओमध्ये त्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात सैरावैरा धावताना दिसत आहेत.
मुंबई:

Ahmedabad Plane Crash Update :  अहमदाबाद विमान अपघातात आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मृतांमध्ये विमानात असलेले प्रवासी तसेच विमान ज्या भागात कोसळले, त्या भागात राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. या अपघातानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे व्हिडिओ?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  हे विमान अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये कोसळले, त्यावेळी सीता पाटणी नावाच्या या महिला त्यांच्या मुलासोबत अपघातस्थळी उपस्थित होत्या. विमान कोसळताच आगीचे मोठे लोळ उठले. याच आगीच्या भक्ष्यस्थानी त्यांचा 15 वर्षांचा मुलगा सापडला आणि त्याचा मृत्यू झाला.

परंतु, सीता पाटणी शेवटपर्यंत त्यांच्या मुलाला त्या आगीच्या थैमानातून वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. या प्रयत्नात त्या स्वतःही खूप भाजल्या आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात सैरावैरा धावताना दिसत आहेत. त्यांच्या अगदी बाजूला विमान कोसळल्यानंतर आगीचे लोळ उठलेले दिसत आहे.

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash : 'गणपती बाप्पामुळे वाचले', मृत्यूला चकवा देणाऱ्या महिलेचा थरारक अनुभव )
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com