- कनॉट प्लेस परिसरात अमेरिकन कंटेंट क्रिएटर स्टीव यालोने रस्त्यावर पेन विकणाऱ्या वृद्ध महिलेची मदत केली
- स्टीवने पहिल्यांदा दोन पेन खरेदी केले आणि नंतर आजींकडे असलेले सर्व पेन खरेदी करण्याचा निर्णय घेतला
- स्टीवच्या खिशात फक्त 550 रुपये शिल्लक असल्याने त्याने ती रक्कम दिली पण फक्त दोनच पेन घेतले
काही घटना अशा असतात ज्याने लाखो मनं जिंकली जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात एका परदेशी तरुणाने भारतीय वृद्ध महिलेची केलेली मदत चर्चाचा आणि कौतूकाचा विषय ठरली आहे. त्या तरुणाने मदत केल्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर आलेलं हस्य लाखमोलाचं होतं. हा परदेशी तरुण कंटेंट क्रिएटर आहे. त्याने याचा एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर टाकले आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद ही मिळाला आहे.
सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही. तर ते काही वेळा माणुसकीचे दर्शन घडवण्याचे माध्यमही ठरत आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. दिल्लीच्या प्रसिद्ध कनॉट प्लेस परिसरात अशी एक घटना घडली आहे. इथला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका अमेरिकन कंटेंट क्रिएटरने रस्त्यावर पेन विकणाऱ्या वृद्ध महिलेला अनोखी मदत केली. त्याने केलेली ही मदत नेटीझन्सच्या पसंतीस उतरत आहे. या संवेदनशील कृतीने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. स्टीव यालो असे या अमेरिकन पर्यटकाचे नाव आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
एक वृद्ध महिला कनॉट प्लेसच्या रस्त्यावर पेन विकते. ती रोज तिथे पेने विकण्याचं काम करते. त्याच वेळी तिथे आलेल्या स्टीवने या आजीकडून दोन पेन विकत घेतले. त्यासाठी त्याने तिला 100 रुपये दिले. स्टीवने दोन पेन खरेदी केल्यानंतर आजीच्या चेहऱ्यावरचं हसू त्याला भावलं. तिचा सकारात्मक दृष्टिकोन पाहून तो प्रभावीत झाला. त्याने आजीकडे असलेले सर्व पेन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आजींकडे अजूनही पेन होते. हे त्याच्या लक्षात आले. त्याने ते सर्व पेन खरेदी करण्याचं ठरवं. त्याची किंमत 900 रुपये होत होती. मात्र, त्यावेळी स्टीवच्या खिशात फक्त 550 रुपये शिल्लक होते. त्याने कोणताही विचार न करता आपल्या खिशातील संपूर्ण 550 रुपये आजींना देऊन टाकले आणि फक्त 2 पेन घेऊन त्यांना शुभेच्छा देत निघून गेला.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लाखो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतांश नेटीझन्सनी स्टीवच्या या दयाळूपणाचे आणि आदराचे कौतुक केले आहे. युजर्स म्हणतात माणुसकी हीच माणसाची खरी ओळख असते, अशी भावना एका युझरने व्यक्त केली. मात्र, दुसरीकडे काही युझर्सनी यावर वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. अशा प्रकारची आर्थिक मदत केल्याने हे लोक नेहमी याच गरिबीत राहतील. केवळ श्रीमंत पर्यटकांवर अवलंबून राहतील, अशी टीकाही एका युझरने केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world