Mother-Son Emotional Bond Viral News : लहान मुलांनी म्हटलेली छोटीसी गोष्ट मोठ-मोठ्यांना विचार करण्यास भाग पडते, असं अनेकदा घडतं. सध्या सोशल मीडियावर एक अशी स्टोरी व्हायरल होत आहे, जी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. एका आईने तिच्या मुलासोबत झालेला संवाद शेअर केला आहे. पण कोणालाही याचा अंदाज नव्हता की,हे संभाषण हजारो लोकांच्या हृदयाला स्पर्श करेल.हे प्रकरण फक्त एक ग्रीटिंग कार्ड बनवण्याच्या वचनापुरतं होतं. पण संध्याकाळ होईपर्यंत असं काही घडलं की,मुलाच्या आईलाही आश्चर्याचा धक्का बसला. मुलाने असा प्रश्न विचारला की, त्या प्रश्नाने त्याच्या आईलाच नाही, तर तमामा माता-पित्यांना विचार करायला भाग पाडलं. जे रोज काम आणि कुटुंब यांच्यातील समतोल साधण्याचा प्रयत्न करतात.
एक वचन, जे पूर्ण झालं नाही
महिलेच्या माहितीनुसार, सकाळी शाळेत जाण्याआधी तिच्या सात वर्षाच्या मुलाने विचारलं की,दोघे मिळून एक ग्रीटिंग कार्ड बनवू शकतो. आईने तिच्या मुलाला तसं वचन दिलं.पण दिवसभर कामात व्यस्त राहिल्याने ती वेळेवर घरी पोहोचली नाही.ऑफिसमधून निघणे, मुलाला पिकअप करणे आणि घरी पोहोचण्यात खूप उशिर झाला. घरी पोहोचल्यावर आईने पाहिलं की,मुलगा नाराज आहे.
नक्की वाचा >> Badlapur News: बदलापुरात डबल मर्डर, ओला चालक अन् महिलेसोबत काय घडलं? लहान मुलाच्या जबाबाने पोलिसही हादरले
त्यानंतर तिने मुलाला याचं कारण विचारलं. पण मुलाने असा प्रश्न विचारला,जो ऐकून तिला धक्काच बसला. 'तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचा कोण आहे? मी की तुमचा ऑफिस?',असा प्रश्न त्या मुलाने त्याच्या आईला विचारला. आईने लगेच उत्तर दिलं की,तिच्यासाठी जगात सर्वात जास्त महत्त्वाचा तिचा मुलगाच आहे.यावर त्या मुलाने विचारलं की, याआधी ही गोष्ट माहित नव्हती की..पण मुलाच्या प्रश्नाने आईला पुरतं विचारात पाडलं.
आईने मुलाला विश्वासात घेतलं आणि..
महिलेनं म्हटलं की, रात्री मुलगा झोपण्यापूर्वी तिने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. कामामुळे अनेकदा उशिर होतो. तिने मुलाला म्हटलं की,कामाचा दबाव आणि जबाबदारी कधी कधी वेळ हिरावून घेते. पण याचा अर्थ असा नाही की,त्याचं महत्त्व कमी होतं. आईने मुलाला विश्वासात
घेतलं. ती मुलाला म्हणाली, तूच माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आणि नेहमीच राहशील.
नक्की वाचा >> Dhule News धुळेकरांनो सावध व्हा! एका कुटुंबाने आंधळा विश्वास ठेऊन प्लंबरला घरचं काम दिलं, पण त्याची नियत फिरली
व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या.अनेक लोकांनी म्हटलं की, ते सुद्धा अशा परिस्थितीतून गेले आहेत. मुलांना वेळ न दिल्याने खूप वाईट वाटतं. तर काही लोकांनी आईचं कौतुक करत म्हटलं, मुलांशी खुलेपणाने बोललं पाहिजे. त्यांना काही गोष्टी समजावण खूप महत्त्वाचं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world