मेहबुब जमादार, प्रतिनिधी
Raigad Leopard Video Viral : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यात काही लोकांचा मृत्यूही झाल्याचं उघडकीसं आलंय. रायगड मध्ये अलिबाग येथील नागावमध्येही बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला होता. त्यावेळी नरभक्षक बिबट्याने नागरिकांवर हल्लाही केला होता. ही घटना ताजी असतानाच आता जाणाऱ्या मुंबई पुणे जुन्या मार्गावरील बोरघाटामध्ये पुन्हा एकदा बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झाल्याने नागरिकांसह प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.
11 फेब्रुवारी च्या मध्यरात्री बोर घाटातून टाटा कंपनीकडे जाणाऱ्या रोडवर बिबट्याच्या बछड्याने रोड क्रॉस केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालं आहे. या परिसरात टाटा हायड्रोपॉवर कंपनी आणि खोपोलीतील लोकवस्ती आहे. येथील नागरिकांनी रात्री एकटे बाहेर न पडण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत.लहान मुलांनीही एकटे बाहेर पडू नये, अशी सूचना खालापूर तालुका आरएफओ राजेंद्र पवार यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिल्या आहेत.
नक्की वाचा >> सोशल मीडियाचा वापर करून शिर्डीत सुरु होता घाणेरडा प्रकार, नको ते करताना 4 मुलींना रंगेहाथ पकडलं, पाहा Video
— Naresh Shende (@NareshShen87640) February 11, 2026
मंकी हील या सबस्टेशन परिसरातही बिबट्याचा वावर
बोर घाटामधील या डोंगर माथ्यावर मुंबई पुणे रेल्वे लाईनला असलेल्या मंकी हील या सबस्टेशन परिसरात सुद्धा अनेकदा बिबट्याचा वावर पाहायला मिळाला होता. त्यामुळे या ठिकाणी कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. अशातच बोर घाटात बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झाल्याने बोर घाटातील डोंगरात टाटा कॉलनी असो, गारमाळ, वाघराळ, दत्तवाडी, दस्तुरी, मंकी हिल अशा भागात नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन वन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world