जाहिरात

Pune News : पुणेकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी हा व्हिडीओ बघाच! 'या' 2 सोसायट्यांमध्ये फिरतोय नरभक्षक बिबट्या

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री केशवनगर परिसरात बिबट्याचं मुक्त संचार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Pune News : पुणेकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी हा व्हिडीओ बघाच! 'या' 2 सोसायट्यांमध्ये फिरतोय नरभक्षक बिबट्या
Pune leopard Viral Video
पुणे:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

Leopard In Pune City Video Viral : पुणे शहरात मागील काही दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री केशवनगर परिसरात बिबट्याचं मुक्त संचार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याने सरकारने योग्य त्या उपाययोजन राबवण्यासाठी पावलेही उचलली आहेत.गुरुवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास केशवनगरमधील'कोणार्क रीवा'(Konark Riva) आणि 'अल्कॉन सिल्वरलीफ'(Alcon Silverleaf) या दोन सोसायट्यांच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने खळबळ उडाली आहे.या बिबट्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला असून व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. 

वनविभागाने नगरिकांना केले मोठे आवाहन

मिळालेल्या माहितीनुसार, केशवनगर परिसरात बिबट्या खुलेआम फिरत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. बिबट्या सोसायटीच्या आवारात फिरत असल्याचं एका सुरक्षा रक्षकाने पाहिलं. त्यानंतर त्याने स्वत:ला केबिनमध्ये कोंडून ठेवलं. आज गुरुवारी सकाळी वन विभागाने या परिसराची पाहणी केली. तेव्हा त्यांना ओल्या मातीत बिबट्याच्या पाऊलखुणा दिसल्या. केशवनगर वेल्फेअर असोसिएशनने रहिवाशांना रात्री 9 नंतर बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसच लहान मुलांना एकटे न सोडण्याचा सल्लाही दिला आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनाही योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सांगण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> Akola News: शिक्षकाच्या लाचखोरीचा भांडाफोड! 'उंच उडी'ची चर्चा अन् ACB ची कारवाई, पण न्यायालयात...

त्या बिबट्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल 

या व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एका सोसायटीच्या पार्किंग एरियात बिबट्या दबक्या पावलांनी प्रवेश करतो. हा बिबट्या सोसायटीच्या परिसरात फिरत असताना इकडे तिकडे पाहतो. बिबट्या जणू काही त्याची शिकारच शोधत आहे, असंच या व्हिडीओतील दृष्य पाहिल्यावर वाटतं. दरम्यान, पुण्यातील पाषाण,सुतारवाडी परिसरातही बिबट्याचं दर्शन घडलं होतं.या बिबट्यांसाठी वन खात्याकडून शोध मोहिम सुरु करण्यात आली होती. औंध आणि बावधन विमानतळ परिसरातही बिबट्याचा संचार वाढला होता. जुन्नर,शिरूर अंबेगाव, केढ तालुक्यांमध्येही बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आली होती. 

नक्की वाचा >> "सर्वच चुकीचे गातात..", धुरंधर अक्षय खन्नाच्या FA9LA गाण्याचे बोल आहेत तरी काय? खुद्द गायकाने सर्वच सांगितलं

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com