
- अमेरिका की टेक कंपनी एस्ट्रोनमर के CEO एंडी बायरन और HR हेड क्रिस्टिन कैबोट का म्यूजिक कॉन्सर्ट में गलबहियां करते हुए वीडियो वायरल हुआ.
- बोस्टन के जिलेट स्टेडियम में कोल्ड प्ले के कॉन्सर्ट के दौरान किस कैम ने दोनों के निजी पलों को बड़ी स्क्रीन पर दिखा दिया.
- वायरल वीडियो के बाद दोनों के परिवारों में विवाद और उथल-पुथल की खबरें सामने आई हैं, खासकर CEO एंडी बायरन की निजी जिंदगी पर असर पड़ा है.
Andy Byron Kristin Cabot viral Video: अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपनी ॲस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायरन आणि त्यांच्याच कंपनीच्या एचआर विभागाच्या प्रमुख क्रिस्टिन कॅबोट यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बॉस्टन येथील जिलेट स्टेडियममध्ये झालेल्या कोल्डप्ले (Coldplay) या जगप्रसिद्ध बँडच्या कॉन्सर्टदरम्यानचा हा व्हिडिओ असून, 'किस कॅम'वर त्यांचे खासगी क्षण दिसल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
कॉन्सर्टदरम्यान 'किस कॅम'वर उपस्थित प्रेक्षकांचे रोमँटिक क्षण मोठ्या स्क्रीनवर दाखवले जातात. याच 'किस कॅम'ने अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबोट यांच्यातील जवळीक कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या खासगी आयुष्यात, विशेषतः सीईओ अँडी बायरन यांच्या वैयक्तिक आयुष्यात, मोठी उलथापालथ झाल्याचे बोलले जात आहे.
अँडी बायरन यांचं लग्न झालेलं असून त्यांना 2 मुले आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावरील त्यांच्या प्रोफाइलमधून 'बायरन' (Byron) हे आडनाव काढून टाकल्याचेही वृत्त आहे. यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
क्रिस्टिन कॅबोट नोव्हेंबर 2024 मध्ये ॲस्ट्रोनॉमर कंपनीत एचआर प्रमुख म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यापूर्वी त्यांनी डिगीटासएलबीआय सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मात्र हा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर कॉर्पोरेटमधील वातावरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असे खासगी क्षण सार्वजनिक होणे आणि त्यातून निर्माण झालेले वाद, हे कॉर्पोरेट संस्कृतीसाठी योग्य आहे का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकाच कंपनीतील दोन वरिष्ठ पदांवरील व्यक्तींच्या अशा संबंधांमुळे कामाच्या ठिकाणी आणि कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो, यावरही चर्चा सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world