जाहिरात

August 2025 Horoscope: तीन ग्रह बदलतायत चाल, ऑगस्ट महिना ठरेल दोन राशींसाठी कमाल

Horoscope for August 2025: ज्योतिषाच्या अभ्यासक नीती कौशिक यांनी  सगळ्या राशींसाठी ऑगस्ट महिना कसा असेल याचे भाकीत वर्तवले आहे.

August 2025 Horoscope: तीन ग्रह बदलतायत चाल, ऑगस्ट महिना ठरेल दोन राशींसाठी कमाल
मुंबई:

August 2025 Horoscope: ऑगस्ट महिना सुरू होत असून हा महिना कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल याची उत्सुकता लाखो लोकांना आहे. ज्योतिषाच्या अभ्यासक नीती कौशिक यांनी  सगळ्या राशींसाठी ऑगस्ट महिना कसा असेल याचे भाकीत वर्तवले आहे. सोबतच त्यांनी काही राशींच्या लोकांसाठी उपायही सुचवले आहेत. कन्या आणि धनु राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना हा लाभदायक ठरण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यांच्या मते 12 राशींसाठी ऑगस्ट 2025 कसा असेल पाहूयात. 

सिंह रास (LEO):

ऑगस्ट महिना हा लिंह राशीवाल्यांसाठी फार चांगला जाईल. नेतृत्वगुण, आंतरीक उर्जेची ही राशी मानली जाते. या राशीच्या व्यक्ती दूरदर्शी असतात, मोठा विचार करण्याची यांच्यात क्षमता असते. या राशीच्या व्यक्तींना स्वत:सोबतच जगासाठीही बरंच काही करायची इच्छा असते. सध्या तीन ग्रह आपली चाल बदलत आहेत. शनि, मर्क्युरी आणि नेपच्युन हे तीन ग्रह आपली चाल बदलतायत. दूरदृष्टीचा वापर करून पुढचा विचार करण्याची या राशीच्या व्यक्तींना चांगली संधी आहे. मात्र त्यासाठी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. सध्याचा जमाना हा एआयचा जमाना आहे. गोष्टी सोप्या करण्याच्या नादात आपण हे विसरत चाललोय की त्यासाठी आपल्याला जी किंमत मोजावी लागणार आहे ती खूप मोठी असणार आहे. 

कुंभ रास (Aquarius):

ओळख, बदल आणि  तुमची क्षमता याबद्दलचा बदल तुम्हाला या महिन्यात अनुभवायला मिळेल. साप जसा कात टाकतो तसे तुमचेही होणार आहे, तुम्हाला स्वत:ची नव्याने ओळख होणार आहे.  उदा. तुमच्या जीवनशैलीत बदल होईल, तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल होतील किंवा तुम्ही जे काम करता अथवा व्यवसाय करता त्यामध्ये तुम्हीच बरेच बदल घडवून आणाल. त्यात एक नावीन्य आणण्याचाही तुम्ही प्रयत्न कराल. कारण आत्मपरीक्षणानंतर तुम्हाला हे जग नव्याने दिसायला आणि कळायला लागेल. पारंपरीक गोष्टी आणि आधुनिक गोष्टी यांचा एक मिलाफही या राशीच्या व्यक्तींना अनुभवता येईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल, कुटुंबासोबत तुम्ही फिरायला जाल. व्यायामाची सवय लावून घ्या. गाणं लावून त्यावर डान्स करू शकता, योगा करू शकता किंवा असा व्यायाम करू शकता ज्यामुळे तुमचा मेंदू ताजातवाना होईल आणि नवा विचार करण्यासाठी प्रेरीत करेल. अर्ध वर्ष सरलं असून  पुढे काय करायचंय याचा विचार करण्याचा ही योग्य वेळ असणार आहे. 8-8 पोर्टलचा तुम्ही छान पद्धतीने वापर करू शकता. श्रावणाचा महिना असल्याने भगवान शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करणे, निळ्या रंगाचे फूल अर्पण करून भगवान शंकराकडे तुम्ही उरलेलं वर्ष हे भरभराटीचं जावो यासाठी प्रार्थना करू शकता. 

मीन राशी (Pisces):

ऑगस्टचा महिना संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. नातेसंबंधांमध्ये थोडासा तणाव जाणवेल. बुध ग्रहाची चाल बदलत असून तोपर्यंत हे ताणतणाव जाणवत राहतील. बदल हळूहळू होत असल्याने थोडीशी गोंधळलेली मानसिकता असेल. मात्र ही भावना मनातून काढून टाका कारण बदलाला सुरूवात झाली असून हा बदल होतोय ही तुमच्यासाठी सकारात्मक बाब म्हणावी लागेल. ऑगस्ट महिन्यात आर्थिक पातळीवर फार अडचण येणार नाही, मात्र तुमच्याकडून लोकं पैसे मागण्याची शक्यता आहे. अशांना पैसे देणं कसं टाळायचं हे तुम्ही आतापासूनच ठरवलं पाहीजे. कारण दिलेला पैसा तुम्हाला परत मिळेल याची शाश्वती फार नाहीये. कोणतेही काम करताना थोडा विचार करून मग त्याला सुरूवात करा. या राशीची लोकं अतिविचार करतात, मात्र असं करू नका. या महिन्यात खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. पैसा खर्च करताना विचार करा. 

मेष राशी (Aries):  

या राशीच्या लोकांसाठी गोष्टी चांगल्या सुरू आहेत, मात्र ऑगस्ट महिन्यात थोडं सावध होण्याची गरज आहे. वाद-विवादापासून लांब राहा. शनि आणि वरूण किंवा नेपच्युन ग्रहांनी चाल बदलली असून नाकारात्मक विचार मनात येऊ शकतात. 'आपण ही गोष्ट करू शकू अथवा नाही? मी या गोष्टीसाठी तयार आहे का ? मी करतोय ते बरोबर आहे की नाही' अशा शंका मनात येऊ शकतात. वर्षाची सुरूवात चांगली झालीय मात्र असं अडथळे का येऊ लागलेत असा विचार मनात डोकावू लागू शकतो. गोष्टी मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या रितीने का होत नाहीयेत असाही विचार मनात येऊ शकतो. मात्र ग्रह बदलांची स्थिती ही तात्पुरती असून तोपर्यंतच हा त्रास सतावेल, नंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल. जे चढउतार बघायला मिळतील ते तुमच्या कर्मामुळे अनुभवायला मिळतील. जर एखाद्या गोष्टीसाठी एक पाऊस मागे यावं लागलं तर त्यात संकोच बाळगू नका. आयुष्याच्या मार्गातील एक वळण अडचणीचं आहे म्हणजे पूर्ण मार्गच खडतर आहे असं होत नाही. यावर उपाय म्हणून असं काहीतरी काम सुरू करा जे आजपर्यंत तुम्ही कधीही केलं नव्हतं. हे काम त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा व्हावा यासाठी नाही तर त्यातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल या उद्देशाने काम करा. तुमचा भार हलका करू शकेल असे साथीदार जोडा आणि त्यांच्या मदतीने काम करायला शिका. आर्थिक निर्णय घिसाडघाईने घेऊ नका. मोठी गुंतवणूक करणे ऑगस्ट महिन्यात टाळा. नोकरी बदल करण्याबाबत विचार करत असाल तर नव्या संस्थेबाबतची माहिती काढा आणि नोकरी बदलावी का याचा नीट विचार करा. मनातल्या गोष्टी मनातच ठेवू नका. जवळच्या व्यक्तींकडे त्या गोष्टींबद्दल व्यक्त व्हा. असं झालं तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी फार छान जाईल. 

वृषभ राशी (Taurus):

बुध ग्रहाच्या चाल बदलामुळे ऑगस्ट महिन्यात अर्धा काळ हा काहीचा त्रासदायक ठरू शकतो. संवादाच्या अभावामुळे काहीसा त्रास होऊ शकतो. त्यामुळे स्पष्टवक्तेपणा ऑगस्ट महिन्यात फायदेशीर ठरू शकतो. मात्र स्पष्टवक्तेपणामुळे लोकं तुम्हाला फटकळ समजण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे वादाचे प्रसंद उद्भवले तर थोडे शांत व्हा आणि शांतपणे परिस्थिती हाताळा. या महिन्यात शॉर्ट ट्रीप करण्याची शक्यता आहे. घरातील विजेची उपकरणे तुटण्या-फुटण्याची शक्यता आहे, किंवा ती रिपेअर करावी लागण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे ऑगस्ट महिन्यात फायदेशीर ठरू शकते. दर सोमवारी ॐ नम: शिवायचा जप करा. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करू शकता. यामुळे मन शांत होण्यास मदत होईल. विचारांमध्ये स्पष्टता येण्यास मदत होईल. 

मिथुन राशी (Gemini):

बुध ग्रह हा राशीचा स्वामी आहे यामुळे ऑगस्ट महिन्याचा पूर्वार्ध थोडासा अडचणींचा ठरू शकतो. मनाप्रमाणे गोष्टी होत नसल्याने मानसिक त्रास होईल. मात्र हा काळही सरेल. जर प्रवास करणार असाल तर त्यासाठीचा प्लॅन दोनवेळा तपासून पाहा. या राशीच्या लोकांना नव्या गोष्टी शिकण्यात रस असतो. त्यामुळे नवा कोर्स किंवा नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. बुद्धीला चालना मिळेल अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. ज्ञान मिळवण्याची सततची प्रक्रिया तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पाणी जास्त प्या. एआयशी निगडीत गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. झालेल्या गोष्टींवर विचार करत बसणं सोडून द्या. 

कर्क राशी (Cancer):

नातेसंबंध सुधारतील, नोकरदार वर्गाला नवी संधी चालून येईल. प्रवास करण्याची संधी मिळेल. अडकलेले प्रोजेक्ट बंद करून नव्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरूवात कराल. मानसन्मान, प्रतिष्ठा वाढेल. कामामुळे होणारी धावपळ वाढेल. फार दूरचा म्हणजे ५-६ वर्षानंतरचा विचार करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा, अतिखर्च टाळा. 

सिंह राशी (Leo):  

या राशीमध्ये ज्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. बुध ग्रहाचा चाल बदलामुळे तुमच्या आनंदावर काहीसं सावट पडेल. नियोजित गोष्टी पूर्ण करत असताना त्यात काही अडथळे येऊ शकतात. मात्र चालबदलानंतर हे दिवस सरतील आणि सगळं मळभ दूर होईल. ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध छान असेल. जुने वाद विसरा. उधळपट्टी करू नका, खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवासाचे प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक करा. ऑगस्ट महिन्यात इतरांसोबत मिळून मिसळून काम केल्यास फायदा होईल. 

कन्या राशी (Virgo):

22 ऑगस्टला सूर्यदेव या राशीत प्रवेश करते होणार आहे. घरातील पडदे सारा आणि सूर्याची किरण घरभर पसरू द्या. अंधाऱ्या खोलीत, सूर्यप्रकाश फार येत नसलेल्या एसी खोलीत दिवस घालवणं कमी करा. या महिन्यात तुम्ही काही मोठे निर्णय घ्याल. हे निर्यण तुम्हाला पुढच्या अनेक वर्षांसाठी फायदेशीर ठरतील. पोटाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे, त्याकडे लक्ष द्या. बाहेरचे खाणे टाळा, हिरवे पदार्थ खाणे टाळा. कच्च्या भाज्या खाणे टाळा. 

तूळ राशी (Libra):

या महिन्यातही तुम्ही SWOT Analysis कराल म्हणजे सगळ्या गोष्टी तोलून मापून पाहाल. गोष्टी सुधारताना दिसू लागल्या आहेत. करिअरच्या बाबतीतही चांगल्या गोष्टी घडताना दिसतायत. कारण तुम्ही बराच अडचणींचा काळ बघितला आहे. नातेसंबंधांमध्ये थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात, ज्यामुळेही त्रास होऊ शकतो. अशावेळी तिखटपणे बोलणं टाळा. ॐ जप करणे फायदेशीर ठरेल. नवे मित्र जोडाल. 

वृश्चिक राशी (Scorpio):

या राशीच्या व्यक्तींनी दोन दिवस एकांतात घालवावेत आणि आत्मपरीक्षण करावे. ज्या गोष्टींपासून तुम्ही पळ काढत होता त्या गोष्टी कोणत्या आहेत हे शोधून काढा त्याबद्दलचे आत्मपरीक्षण करून पुढे कसे जायचे याचा विचार करा. चुका पुन्हा होणार नाही याबद्दलचे आत्मपरीक्षण कराल. एखादं व्यसन किंवा वाईट गोष्ट सोडण्यासाठी ऑगस्ट महिना उत्तम आहे. कामाबद्दलचा अपेक्षित वेग मिळत नसल्यामुळे निराश होऊ नका. पडद्यामागे बऱ्याच साऱ्या गोष्टी घडतायत, अशा अनेक शक्ती आहेत ज्या तुमच्यासोबत उभ्या आहेत. त्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. 

धनु राशी (Sagittarius):

नव्या गोष्टी घडू लागल्याने धनु राशीच्या लोकांना फार आनंद होईल. नवी कामे मिळतील, वेगळी कामे मिळतील. तुम्हाला ज्या गोष्टी आत्मसात करायच्या होत्या त्या दृष्टीक्षेपात येतील. ऑगस्ट महिन्याचा पूर्वार्ध हा थोडासा स्लो असेल मध्यावधीमध्ये पुन्हा एकदा वेग पकडलेला पाहायला मिळेल. स्वत:वर विश्वास ठेवा आणि जे ज्ञान तुम्ही आत्मसात केले आहे ते प्रत्यक्षात आणा.  नवी लोकं भेटतील, नवी ठिकाण पाहण्याची संधी मिळेल. 

मकर राशी (Capricorn):

बुध ग्रहाच्या चाल बदलण्याने काही गोष्टी रेंगाळतील मात्र यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. ऑगस्ट महिन्यात नव्या संधी, नवी नोकरी, नवा व्यवसाय यावर लक्ष केंद्रीत कराल. पोर्णिमेच्या दिवशी लक्ष्य काय होते, ते साध्य झाले अथवा नाही याबद्दलची स्पष्टता येईल. मित्र-मैत्रिणींकडून चांगला पाठिंबा मिळेल, ते योग्य निर्णय घेण्यातही मदत करतील. निळा आणि हिरव्या रंगाचा वापर वाढवा. सिंगल  व्यक्तींच्या आयुष्यात एक व्यक्ती येईल ज्याची तुम्ही खूप वाट पाहात होता. 

नीती कौशिक यांनी त्यांच्या nittygrittywithdr.neetikaushik या युट्युब चॅनेलवर 12 राशींसाठी ऑगस्ट महिना कसा असेल हे सविस्तरपणे सांगितले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com