- A Bengaluru commuter’s “Are you coming?” text to a cab driver got a strange reply.
- The driver responded, “This is not airplane,” then cancelled the trip.
- Many Social media users sympathised with the driver’s frustrations in city traffic.
बंगळूरमधील एका प्रवाशाने कॅब ड्रायव्हरला पाठवलेला एक मेसेज आणि त्यावर ड्रायव्हरने दिलेले अजब उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅब बुक केल्यानंतर राइड कन्फर्म करण्यासाठी 'तुम्ही येत आहात का?' (Are you coming?) असा साधा मेसेज पाठवण्याची अनेक प्रवाशांना सवय असते. पण यावेळी ड्रायव्हरने दिलेले उत्तर ऐकून प्रवासी आश्चर्यचकित झाला.
व्हायरल झालेला मेसेज
रेडिट (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने हा किस्सा शेअर केला आहे. कॅब बुक केल्यानंतर प्रवाशाने ड्रायव्हरला मेसेज पाठवला, "तुम्ही येत आहात का?" यावर ड्रायव्हरने त्वरित उत्तर दिले, "हे विमान नाहीये जर घाई असेल तर दुसरी बुक करा." इतकेच नाही तर ड्रायव्हरने त्वरित ती ट्रिप रद्द केली, ज्यामुळे प्रवासी गोंधळला आणि त्याला हसूही आवरले नाही.
My Uber driver is not in a good mood
byu/hariprasadrangan inBengaluru
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया आणि सहानुभूती
अनेक युजर्सनी ड्रायव्हरबद्दल सहानुभूती दर्शवली, कारण बंगळूरमधील वाहतूक, बराच वेळ थांबावे लागणे आणि दोन्ही बाजूंच्या वाढत्या तणावामुळे ड्रायव्हर्सची मन:स्थिती कशी असते, यावर अनेकांनी मत व्यक्त केले.
एका युजरने स्वतःचा अनुभव शेअर केला. "एकदा मी उबर ड्रायव्हरला फोन केला आणि त्याने मोठा आवाजात 'मी येत आहे, हे हेलिकॉप्टर नाहीये' असे उत्तर दिले. मी त्याला उत्तर दिले."
(नक्की वाचा- VIDEO: लॉटरीच्या नावाखाली मराठी माणसांची फसवणूक! साताऱ्यात 'उत्तर भारतीय' टोळीचा भांडाफोड; पाहा व्हिडीओ)
ड्रायव्हर्सचा तणाव
एका युजरने ड्रायव्हर्सच्या समस्या सांगताना म्हटलं की, "अनेक जण 2-3 ॲप्सवर कॅब बुक करतात आणि एक आल्यावर दुसऱ्या ॲपमधील राइड रद्द करतात, त्यामुळे ड्रायव्हर इतका प्रवास करून तिथे पोहोचल्यावर राइड रद्द झाल्यास त्यांना खूप निराशा येते.
या व्हायरल घटनेतून बंगळूर शहरातील कॅब ड्रायव्हर्सचा वाढता तणाव आणि ग्राहकांची अपेक्षा, यांतील यातला फरक स्पष्टपणे दिसून येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world