जाहिरात

Trending News: बॅचलर मुलाच्या खोलीत 2 पोरींचा मुक्काम! सकाळी सोसायटीवाले अन् थेट... धक्कादायक प्रकरण

Bengaluru Society News: आम्हीही फॅमिली इतकाच समान मेंटेन्स खर्च देतो, मात्र आम्हाला अशी का वागणूक दिली जाते? असा सवाल या तरुणांनी केला आहे. 

Trending News: बॅचलर मुलाच्या खोलीत 2 पोरींचा मुक्काम! सकाळी सोसायटीवाले अन् थेट... धक्कादायक प्रकरण

Bengaluru Society News: सध्या रहिवासी सोसायट्यांमध्ये अनेक नवनवे नियम केले जात आहेत. कधी सेल्समनला बंदी, कधी सोसायटीच्या आवारात गाड्या लावण्यास, खेळण्यास बंदी तर कधी मांसाहार करणाऱ्यांना दंड.. असे अनेक नियम असतात. सध्या बेंगळुरुमधील एका रहिवासी सोसायटीने ठोठावलेल्या अजब दंडाची जोरदार चर्चा होत आहे. या सोसायटीमध्ये बॅचलर तरुणांच्या खोलीत मुली थांबल्यामुळे तब्बल 5 हजाराचा दंड ठोठावला आहे. 

सोसायटीचा अजब फैसला..

​या रहिवाशाने 'Unfair Treatment of Bachelors in Society' असा कॅप्शन देत ही संपूर्ण घटना सांगितली आहे. या मुलांकडे त्यांच्या दोन मैत्रिणी भेटायला आल्या होत्या. सर्वजण गप्पा मारत बसले, बोलता बोलता वेळ कशी गेली समजले नाही. रात्रीच्या १२ वाजल्या, एवढ्या रात्री मुली कशा जाणार? म्हणून त्यांनी तिथेच थांबण्यास सांगितले. मात्र मैत्रिणींना फ्लॅटवर थांबवणे या तरुणांना चांगलेच महागात पडले. 

VIDEO: 140चं स्पीड, KTMचा भयंकर अपघात! युट्यूबरचं शीर धडावेगळं झालं; हादरवणारे CCTV फुटेज

​घडलेल्या प्रकाराबद्दल अधिक माहिती देताना या तरुणाने सांगितले की, त्यांच्याकडून पहिल्यांदाच असे घडले होते, मात्र तरीही त्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा समज न देता थेट ५,००० रुपयांच्या दंडाची पावती (Invoice) देण्यात आली. या पावतीवर स्पष्टपणे '31/10/2025 रोजी दोन मुली रात्री मुक्कामी राहिल्या' असे नमूद केले होते. मुलांनी दंड भरला असला तरी हा भेदभाव असल्याचं म्हटले आहे. 

महत्त्वाचं म्हणजे,  जर सोसायटीमध्ये एखादी फॅमिली असेल तर कोणतेही असे कोणतेही नियम लागू होत नाहीत. त्यांच्या घरी कितीही मुली कितीही काळ राहू शकतात, त्यांना दंड ठोठावला जात नाही. पण बॅचलर मुलांना मात्र वेगळीच वागणूक दिली जाते. आम्हीही फॅमिली इतकाच समान मेंटेन्स खर्च देतो, मात्र आम्हाला अशी का वागणूक दिली जाते? असा सवाल या तरुणांनी केला आहे. 

Viral Video : पेट्रोल पंपावर तुमचीही फसवणूक होतेय? काय आहे '0' नंबर मीटर स्कॅम? ग्राहकाने केला पर्दाफाश

नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया 

दरम्यान,  या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी 'हे आपल्या देशातील सांस्कृतिक आव्हान'असल्याचे मत व्यक्त केले आहे. काही लोकांनी त्वरित सोसायटी सोडण्याचा सल्ला दिला, तर काहींनी सोसायटीच्या नियमांना न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय सुचवला आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या या मनमानी नियमांमुळे, एकाच इमारतीत राहणाऱ्या लोकांना  मिळणाऱ्या असमान वागणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com