जाहिरात

Video : आफ्रिदी, स्वत:चा निशाणा पाहिलास का? 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये देखील हेच झालं!

Operation Sindoor : भाजपाकडून सोशल मीडियावर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या 2007 मधील टी20 वर्ल्ड कपचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Video : आफ्रिदी, स्वत:चा निशाणा पाहिलास का? 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये देखील हेच झालं!
मुंबई:

Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता.भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं. भारतीय लष्करानं या कारवाई अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानी सैन्यानं भारताच्या सीमावर्ती भागातील सामान्य नागरिकांवर हल्ले केले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय सैन्यानं जोरदार उत्तर दिलं. या कारवाईत अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला, ज्याचे पाकिस्तानी सैन्याकडं कोणतेही उत्तर नव्हते. आता दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. बॉर्डरवरचा तणाव शांत झाला आहे. त्यानंतर या चकमकीमध्ये 'आपलाच विजय झाला' असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतोय. पाकिस्तानचे दावे निराधार ठरवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

भाजपने देखील भारतीय जवानांचे तसेच आपल्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचे कौतुक केले आहे. भाजपाकडून सोशल मीडियावर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या 2007 मधील टी20 वर्ल्ड कपचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये  केला आहे. त्याला #OperationSindoor असेच काहीसे होते असं कॅप्शन दिले आहे. 

काय आहे अर्थ?

2007 मधील T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीत सामना डरबनमध्ये खेळला गेला. त्यावेळी निर्धारित ओव्हर्सनंतर दोन्ही टीम्सनी 141 रन काढले. तेव्हा T20 क्रिकेटमध्ये आजच्यासारखा सुपर ओव्हरचा नियम नव्हता. सामन्याचा निकाल बॉल-आऊट' नियमानुसार काढण्यात आला. यात भारतीय खेळाडूंनी प्रत्येक प्रयत्नात स्टंप उडवला. तर पाकिस्तानच्या एकाही बॉलरला स्टंप उडवता आला नाही. 

भारताकडून 'बॉल आऊट'मध्ये वीरेंद्र सेहवागस हरभजन सिंग आणि रॉबिन उथ्थप्पा यांनी अचूक लक्ष्यभेद केला. तर पाकिस्तामच्या यासीर अराफत, उमर गूल आणि शाहीद आफ्रिदीपैकी एकाचा निशाणा लागला नाही. 
 

( नक्की वाचा : Tral Encounter: आई समजावत होती, पण दहशतवादी मुलानं ऐकलं नाही, पाहा 'तो' शेवटचा Video )
 

भाजपने त्याच क्षणाची आठवण करून पाकिस्तानी सैन्याची खिल्ली उडवली आहे. भारतीय सैन्याचे सर्व वार अचूक ठिकाणी लागले होते. तर पाकिस्तानी सैन्याच्या क्षेपणास्त्रांना भारतीय सैन्याने हवेतच नष्ट केले. हेच या क्रिकेटच्या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com