
Jammu Kashmir Tral Encounter: पहलगामध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याने दहशतवाद्यांविरुद्ध जोरदार शोध मोहीम चालवली आहे. या कारवाईदरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये 6 दहशतवादी मारले गेले आहेत. गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आसिफ अहमद शेख पुत्र गुलाम मोहम्मद, राहणार मुंगहामा त्राल; आमिर नजीर वानी पुत्र नजीर, राहणार खासीपोरा त्राल; आणि यावर अहमद भट पुत्र नजीर अहमद, राहणार लारो जागीर त्राल अशी या मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. हे तिघेही जैश-ए-मोहम्मद (JEM) या संघटनेशी संबंधित होते.
आमिर नजीरचा व्हिडिओ
सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवादी आमिर नजीर वानीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या आईशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे. त्याची आई त्याला बाळा शरणागती पत्कर असंही समजावत आहे. आईनं समजावूनही आमीरला काही फरक पडला नाही. त्यानं शरणागती पत्कारली नाही, अखेर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तो मारला गेला.
( नक्की वाचा : Tral Encounter Video: हातामध्ये शस्त्र, पण अवस्था भयंकर! काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या चकमकीचा पाहा ड्रोन व्हिडिओ )
काय आहे व्हिडिओ?
या चकमकीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानुसार दहशतवादी आमिर नजीर वानी चकमकीपूर्वी आपल्या आईशी बोलताना दिसला. आमिर नाजिर वानीची आई म्हणत आहे की शरणागती पत्कर, पण आमिर म्हणतो की सैन्याला पुढे येऊ दे, मग बघतो. अखेर, सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत आमिर मारला गेला.
पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील अवंतीपुराच्या नादेर त्राल भागात दहशतवाद्यांची अचूक माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी करून शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली.
सुरक्षा दलानं प्रत्युत्तरादाखल तीन दहशतवादी मारले गेले. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी शोपियां जिल्ह्यातील केल्लर भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी मारले गेले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरात शोध मोहीम अजूनही सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world