Trending News: ना डिग्री, ना अनुभव.. अवघ्या 19 व्या वर्षी BMWमध्ये नोकरी, तरुणीच्या यशाचं सिक्रेट काय?

तरुणीकडे कोणत्याही कॉलेजची डिग्री, कसलाही अनुभव नसताना तिला बीएमडब्ल्यू कंपनीमधून नोकरीची ऑफर आली आहे. नेमकं हे घडलं कसं? जाणून घ्या... 

जाहिरात
Read Time: 2 mins

Viral News:  आजच्या जगात चांगली नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण, कॉलेजची डिग्री आणि अनुभवाची गरज असते. जितकी मोठी डिग्री, अनुभव तितकीच चांगली नोकरी मिळेल, असाच आपला अनुभव असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एका 19 वर्षीय तरुणीची सक्सेस स्टोरी चांगलीच चर्चेत आली आहे. या तरुणीकडे कोणत्याही कॉलेजची डिग्री, कसलाही अनुभव नसताना तिला बीएमडब्ल्यू कंपनीमधून नोकरीची ऑफर आली आहे. नेमकं हे घडलं कसं? जाणून घ्या... 

Mia Khalifa: लेबनानमधील हल्ल्यांनंतर मिया खलीफाला अश्रू अनावर; अमेरिका-इस्रायलवर गंभीर आरोप

काय आहे सक्सेसचं सिक्रेट? 

हे प्रकरण १९ वर्षीय कंटेंट क्रिएटर गौरी एम हिचे आहे, जिला BMW मध्ये पूर्णवेळ पर्सनल मार्केटिंगचे काम करण्याची ऑफर देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या पोस्टसाठी साधारणपणे पाच वर्षांचा अनुभव आवश्यक असतो. मात्र गौरीकडे असा कोणताही अनुभव नव्हता किंवा पदवीही नव्हती. मात्र तरीही तिने ही नोकरी मिळवली. यामागची तिची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिच्याकडे असलेले प्रभावी पर्सनल ब्रँडिंग कौशल्य..

Advertisement

गौरीचे लिंक्डइनवर ६५,०००+ फॉलोअर्स आहेत तर इंस्टाग्रामवर ३५,०००+ फॉलोअर्स आहेत. तिला नियमितपणे कंटेट शेअर करण्याची सवय आहे. याबाब बोलताना गौरीने सांगितले की, मला जगातील सर्वात मोठ्या कार कंपन्यांपैकी एका कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळाली. मी कोणालाही प्रस्ताव दिला नाही, कोणतेही ईमेल पाठवले नाहीत, तरीही मला ऑफर मिळाली. मला फक्त एका आठवड्यात तीन नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या."

नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया 

गौरीने शेअर केलेल्या या लिंक्डइन पोस्टवरुन नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या. हे काही नशिबाने वगैरे मिळाले असून पर्सनल ब्रँडिंगची ताकद असल्याचे मत एका युजरने व्यक्त केले. तसेच काही नेटकऱ्यांनी  गौरीने यापूर्वी टाटा मोटर्समध्ये काम केले होते आणि ती सोशल मीडियावर नियमितपणे तिची मते मांडत होती ज्याचा तिला फायदा झाल्याचे निदर्शनास आणून दिले. 

(नक्की वाचा-  Iran-US War Update: जगाचं टेन्शन वाढलं! इराण-US युद्ध पुन्हा भडकणार? युद्धविरामानंतर 24 तासात काय काय घडलं?)