- The British Hutchinson family shared a viral video of their Vande Bharat train journey in India
- Their tickets cost about 11 pounds each and included snacks and beverages during the four-hour trip
- The food tray featured diet mixture, caramel popcorn, patty, mango juice, and ginger tea sachet
British Family's Vande Bharat Train Journey: वंदे भारत ट्रेन कमी वेळेत भारतीयांच्या पसंतीस उतरत आहे. भारतीयांसोबतच आता परदेशी नागरिकांना देखील वंदे भारत ट्रेनची भुरळ पडली आहे. वंदे भारत ट्रेन प्रवास केलेलं ब्रिटिश कुटुंब सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या कुटुंबाने वंदे भारत एक्सप्रेसमधील आपल्या चार तासांच्या प्रवासाचा अनुभव इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या कुटुंबाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, ब्रिटिश महिलेने सांगितले की, आम्हा चौघांना या तिकिटाची किंमत प्रत्येकी सुमारे 11 पाउंड म्हणजे जवळपास 1150 रुपये पडली आहे आणि या तिकिटामध्ये जेवणही होते. प्रवासादरम्यान त्यांना मिळालेल्या ट्रेमध्ये डायट मिक्सचर, कॅरॅमल पॉपकॉर्न, पॅटीज, आंब्याचा ज्यूस आणि आल्याच्या चहाचा समावेश होता. चहा पावडरचे पॅकेट पाहून त्यांना सुरुवातीला थोडा गोंधळ झाला, पण गरम पाणी मिळाल्यावर त्यांनी चहाचा आस्वाद घेतला. हा चहा खरोखरच खूप छान आहे, असे महिलेने व्हिडिओमध्ये उत्साहाने सांगितले.
Viral Video:
'वंदे भारत सुपरफास्ट ट्रेन'
व्हिडिओ पोस्ट करेपर्यंत त्याला 1.4 मिलियन (14 लाख) पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते. सोशल मीडिया युजर्सनी हचिन्सन कुटुंबाचे भारताची सकारात्मक बाजू दाखवल्याबद्दल कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट केली, "वंदे भारत अतिशय सोयीस्कर ट्रेन आहे. पुढच्या वेळी प्रवास करताना तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल एजंटला एक्झिक्युटिव्ह क्लासचे तिकीट बुक करण्यास सांगू शकता."
आणखी एका युजरने म्हटले, "वंदे भारत ही सध्याच्या लाइनअपमधील 'लेव्हल-अप ट्रेन' आहे. तुम्ही तेजस, राजधानी एक्सप्रेस आणि विस्टा डोम कोचचा प्रवास करून त्याचा देखील अभुभव घेऊ शकता."
मेक इन इंडियाची शान
चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बांधलेली वंदे भारत एक्सप्रेस ही 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा एक अभिमानास्पद प्रकल्प आहे. या ट्रेनची रचना, असेंब्ली आणि तंत्रज्ञान सर्व स्वदेशी आहे. विशेष म्हणजे, ही ट्रेन भारताच्या स्वतःच्या ‘कवच' टेक्नोलॉजीने सुसज्ज आहे. एकाच मार्गावर दुसरी ट्रेन आढळल्यास ही प्रणाली आपोआप ब्रेक लावते, ज्यामुळे प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world