
CCTV cat saves woman: पाळीव प्राणी केवळ आपले मनोरंजनच करत नाहीत, तर अनेकदा ते आपल्या जीवनाचे रक्षकही बनतात. याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चीनमधील एका घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यात एका मांजराने आपल्या मालकिणीचा जीव वाचवला आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, एक चिनी महिला आपल्या सोफ्यावर बसून मोबाईल फोन पाहत आहे आणि तिच्या बाजूला तिची तीन पाळीव मांजरे आहेत. अचानक, त्यातील एका मांजराला काहीतरी धोका असल्याची जाणीव होते आणि ते सतर्क होते. काही क्षणातच इतर दोन मांजरेही सतर्क होतात आणि इकडे-तिकडे धावू लागतात.
मांजरांच्या या असामान्य वागणुकीमुळे महिलेचे लक्ष मोबाईलवरून हटते आणि ती उभी राहते. ती आणि तिची मांजरे तिथून बाजूला सरकतात, आणि अवघ्या काही सेकंदातच, टीव्ही युनिटच्या मागून एक मोठी टाइल कोसळते, जी नेमकी त्याच जागेवर पडते जिथे महिला काही वेळापूर्वी बसली होती.
जर ती महिला आणखी काही सेकंद तिथेच राहिली असती, तर मोठा अपघात होऊ शकला असता, परंतु तिच्या मांजरांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला. अनेकदा आपण प्राण्यांना केवळ पाळीव प्राणी म्हणून पाहतो, पण ते आपल्या मालकांचं संरक्षणही करतात हे या घटनेने सिद्ध झाले आहे. 'phoenixtv_news' या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world