
13th floor dangerous stunt: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल. ही घटना चीनच्या मल्टीस्टोरी अपार्टमेंटमधील असल्याचं सांगितलं जात आहे. दोन मुलं १३ व्या मजल्याच्या माल्कनीमधून धोकादायक पद्धतीने लटकताना दिसत आहे. हे दृश्य इतकं भयंकर आहे, की कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील.
(China balcony kids video)
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की दोन्ही मुले बाल्कनीच्या रेलिंगबाहेर लटकत आहेत. यादरम्यान, एक मुलगा अचानक पुल-अप करताना दिसत आहे. दोघेही अंगणात खेळावं तसं बाल्कनीच्या बाहेर खेळताना दिसत आहे. पण हा खेळ मृत्यूकडे नेणारा होता, कारण १३ व्या मजल्यावरून पडणे म्हणजे थेट मृत्यूला मिठी मारणे.
मुलं सुरक्षित आहेत की नाही हे मात्र कळू शकलेलं नाही. सोशल मीडिया युजर्सकडून त्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जात आहे.
आई-वडिलांवर संताप... (kids pull-ups on balcony)
हा व्हिडिओ समोरच्या इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीने रेकॉर्ड केला आणि इन्स्टाग्राम अकाऊंट @nihaochongqing वरुन शेअर केला आहे. यानंतर युजर्स मुलांच्या आई-वडिलांवर संताप व्यक्त करीत आहे. आई-वडील इतके निष्काळजी कसे असू शकतात, असा सवाल एका युजरने उपस्थित केला आहे.
नक्की वाचा - Stray Dogs : 4 वर्षाची चिमुरडी घराबाहेर खेळत होती... अचानक भटक्या कुत्र्यांनी घातली झडप! नागपूर हादरले
या घटनेमुळे पुन्हा एकदा उंच इमारतींमधील मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही क्षणांचा निष्काळजीपणा निष्पाप मुलांचे प्राण घेऊ शकतो. व्हिडिओने लोकांना घाबरवले असले तरी, पालकांना सावधगिरी बाळगण्याचा कठोर धडाही शिकवला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world