जाहिरात

Stray Dogs : 4 वर्षाची चिमुरडी घराबाहेर खेळत होती... अचानक भटक्या कुत्र्यांनी घातली झडप! नागपूर हादरले

Stray Dogs Attack in Nagpur : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर वाद सुरु असतानाच स्त्यांवर भटक्या कुत्र्यांची दहशत आणि त्यांचे हल्ले सुरुच आहेत. नागपूरमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

Stray Dogs : 4 वर्षाची चिमुरडी घराबाहेर खेळत होती... अचानक भटक्या कुत्र्यांनी घातली झडप! नागपूर हादरले
Stray Dogs Attack in Nagpur : नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद कायम आहे.
नागपूर:

Stray Dogs Attack in Nagpur :दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले आहेत. श्वानप्रेमींनी या निर्णयाचा विरोध करत न्यायालयानं आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. सोशल मीडिया आणि अन्य माध्यमात हा वाद सुरु असतानाच रसत्यांवरील चित्र बदललेलं नाही. रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची दहशत आणि त्यांचे हल्ले सुरुच आहेत. नागपूरमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

4 वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला

नागपूरातील वर्धमान नगर परिसरातील देशपांडे लेआऊट, त्रिमूर्ती नगर येथे रविवारी दुपारी भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका चार वर्षीय मुलीवर अचानक हल्ला केला. नित्या मोंगरी ही चिमुकली घराबाहेर खेळत असताना तीन ते चार भटके कुत्रे तिच्या मागे लागले आणि तिला चावा घेण्याचा प्रयत्न केला.

( नक्की वाचा : दिल्ली तत्काळ भटके कुत्रेमुक्त करा! सुप्रीम कोर्टाचा कडक शब्दात आदेश )

कुत्र्यांनी नित्याला वेढा घालत चावा घेण्याचा प्रयत्न केल्याने ती जोरजोरात रडू लागली. तिच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे रहिवासी आणि दुकानदार तत्काळ धावून आले. स्थानिकांनी काठ्या आणि दगडांच्या सहाय्याने कुत्र्यांना हुसकावून लावलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या हल्ल्यात नित्याच्या पायाला आणि हाताला किरकोळ जखमा झाल्या असून, तिला तात्काळ जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला असून ती धोक्याच्या बाहेर पडली आहे. 

एनडीटीव्ही मराठीशी बोलतांना नित्याचे वडील श्रावण मोंगरी यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, “शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लहान मुलं आणि वृद्ध यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सरकार आणि मनपाने तातडीने कारवाई करून या कुत्र्यांची व्यवस्था करावी, तसेच त्यांना रस्त्यावर मोकाट फिरण्यापासून रोखावे.” नित्याच्या आईनेही या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. 

( नक्की वाचा : Parbhani News : भूकंप, ज्वालामुखी की आणखी काही, परभणीतल्या शेतातून वाफ येण्याचं कारण समजलं! )

नागपूरच्या देशपांडे लेआउट परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यापूर्वीही काही जणांना चावा घेण्याच्या घटना घडल्या आहेत. पण अद्याप प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही, अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com