जाहिरात

VIDEO: ॲम्बुलन्स की चालता- फिरता OYO! कॉलेज तरुणी, 2 मुले, दरवाजा उघडताच जे दिसलं; व्हिडिओ झाला VIRAL

रुग्णवाहिकेत कोणीही रुग्ण नसून एक मुलगी बसलेली दिसली. पत्रकाराने दुचाकीवरून तब्बल ५ किलोमीटर या रुग्णवाहिकेचा पाठलाग केला आणि अखेर तिला अडवले.

VIDEO: ॲम्बुलन्स की चालता- फिरता OYO! कॉलेज तरुणी, 2 मुले, दरवाजा उघडताच जे दिसलं; व्हिडिओ झाला VIRAL

Ambulance Misuse Viral Video:  मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातून माणुसकीला आणि आपत्कालीन सेवेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी असलेल्या '१०८' रुग्णवाहिकेचा वापर चक्क वैयक्तिक 'मौजमजे'साठी केला जात असल्याचे उघड झाले आहे. सायरन वाजवत सुसाट धावणाऱ्या एका रुग्णवाहिकेत रुग्ण नसून एक महाविद्यालयीन तरुणी आणि तरुण आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याने खळबळ माजली आहे.

ChatGPT ने बनवला 69,000 रुपयांचा खराखुरा वाटेल असा चेक, व्हायरल पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ

तरुण- तरुणी, सुसाट ॲम्बुलन्स... 

मिळालेल्या माहितीनुसार, ही रुग्णवाहिका भररस्त्यात सायरन वाजवत जात होती. सायरनचा आवाज ऐकून नागरिक रस्ता देत होते, मात्र एका जागरूक पत्रकाराला रुग्णवाहिकेच्या खिडकीतून आत डोकावल्यावर संशय आला. रुग्णवाहिकेत कोणीही रुग्ण नसून एक मुलगी बसलेली दिसली. पत्रकाराने दुचाकीवरून तब्बल ५ किलोमीटर या रुग्णवाहिकेचा पाठलाग केला आणि अखेर तिला अडवले.

​जेव्हा रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडला, तेव्हा आतील दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे विस्फारले. त्यात एक शालेय गणवेशातील मुलगी आणि दोन तरुण होते. विचारपूस केल्यावर चालकाने ती आपली बहीण असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र साध्या प्रश्नांची उत्तरेही त्याला देता आली नाहीत. गंभीर रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसताना, सरकारी यंत्रणेचा असा उघड गैरवापर होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया 

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. रुग्णवाहिकेचा असा गैरवापर लज्जास्पद आहे. अनेकदा गंभीर रुग्णांनाही तासनतास थांबावे लागते, मात्र इथे असा गैरप्रकार सुरु आहे. या घटनेमुळे केवळ १०८ सेवेच्या विश्वासार्हतेवरच नव्हे, तर आपत्कालीन सेवांच्या देखरेख आणि उत्तरदायित्वावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

Unique Love Story: दिलदार नवरा! 'ही माझी बायको आजपासून तुझी', पोलीस स्टेशनमध्ये फिल्मी स्टाईल ड्रामा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com