अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून इतकं काम करुन घेतलं जातं की त्याचा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यांची प्रोडक्टिव्हिटी शून्य होते.कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कंपनीनं एक नवी ऑफर काढली आहे. त्यामध्ये त्यांना डेटवर जाण्यासाठी पगारी रजा दिली जाणार आहे.
थायलंडमधील व्हाईटलाईन ग्रुपनं ही घोषणा केली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ते डिसेंबर अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांना डेटिंग अॅपच्या माध्यमातून रोमँटिक कनेक्शनम बनवण्यासाठी टिंडर लीव्ह (Tinder Leave) दिली जाईल. पण त्यासाठी कर्मचाऱ्यांना काही अटी मान्य कराव्या लागतील.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कंपनीनं काय सांगितलं?
कर्मचाऱ्यांना या पद्धतीनं किती दिवस सुट्टी मिळणार हे कंपनीनं ठरवलेलं नाही. पण सर्व कर्मचाऱ्यांना टिंडर गोल्ड आणि टिंडर प्लॅटेनियमची सदस्यता मिळणार आहे. कंपनीचे कर्मचारी डेटवर जाण्यासाठी टिंडर लीव्हचा वापर करु शकतात, असं कंपनीनं त्यांच्या लिंक्डिन पोस्टमध्ये सांगितलं आहे.
'द स्ट्रेट्स टाईम्स'च्या रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी ही सुट्टी सुरु करण्यात आली आहे. प्रेम असेल तर आनंदी राहण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होईल, असं कंपनीनं सांगितलं.
( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )
कशी झाली सुरुवात?
'मी इतका व्यस्त आहे की, डेटवर जाण्यासही वेळ नाही,' असं एक कर्मचारी बोलत असल्याचं मॅनेजमेंटमधील एका अधिकाऱ्यानं ऐकलं त्यानंतर या प्रकराची सुट्टी देण्याचा निर्णय कंपनी मॅनेजमेंटनं घेतला. आता कर्मचाऱ्यांना दिवसा किंवा रात्री डेटवर जाण्याचा पर्याय आहे. हे कर्मचारी यासाठी टिंडर सुट्टीचा वापर करु शकतात. फक्त त्यासाठी कर्मचाऱ्यांना एक आठवडा आधी सूचना द्यावी लागेल.
( नक्की वाचा : Mumbai Dating Scam : मुंबईत डेटिंगच्या नावाखाली पुरुषांच्या फसवणुकीचा धंदा, कशी होते लुबाडणूक? )
सब्सक्रिप्शनही मिळणार
व्हाईटलाईन कंपनीनं कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांसाठी सशुल्क टिंडर प्लॅटिनियम आणि टिंडर गोल्डचं सदस्यत्व देणार आहे. त्यामध्ये अनेक सुविधा आहेत. या सुविधांचा वापर करुन कर्मचारी डेटवर जाण्यासाठी जोडीदार शोधू शकतात. संपूर्ण जगभरातील टिंडर सब्सक्रायरबशी कनेक्ट होण्याचा आणि त्यांच्याबरोबर डेटवर जाण्याची संधी त्यांना यामधून मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world