Groom And Bride Viral Video : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेतात.अशाच प्रकारचा एक भावुक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं यूजर्सच्या मनं जिंकली आहेत. एका मुलीनं तिच्या आईच्या दुसऱ्या लग्नात खास क्षणांना उजाळा दिला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, लग्नाचे सुंदर क्षण यात टिपले आहेत. जे पाहून लोक भावुक होत आहेत. आई-वडिलांच्या लग्नाचं पहिल्या वाढदिवसानिमित्त पूजा भटनागरने मन जिंकणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
पूजाने तिच्या आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत आनंद व्यक्त केला आहे. पूजासाठी तिच्या आईचं दुसरं लग्न एक आनंदाचं क्षण आहे. त्यामुळे पूजाने हृदयाला स्पर्श करणारा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून लोकांनी जबरदस्त प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
नक्की वाचा >>Pune News : बारामतीत सुरु होता सर्वात घाणेरडा प्रकार, भिगवण रोडवरील 'त्या' लॉजवर छापा, परिसरात उडाली खळबळ
मुलगी बनली आईच्या दुसऱ्या लग्नाची साक्षीदार
व्हिडीओत दिसतंय की, पूजाच्या आईच्या दुसऱ्या लग्नाचे काही खास क्षण आहेत, ज्यामध्ये ती एका नवरीप्रमाणे सजलेली पाहायला मिळत आहे. नवे पप्पाही खूप क्यूट दिसत आहे. पूजाने इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, कोणालाही माहित होणार नाही की, मी त्या दिवशी किती रडले. नक्कीच आनंदाचे अश्रू होते. हे पाहून मला आजही खूप आनंद होत आहे. मला आजही खूप खुश आहे की, माझ्या आईचं लग्न आहे. खरं प्रेम नेहमी जिंकतं, हेच मला माहित आहे.
माझ्या प्रिय आई-वडिलांना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @pooja_bhatnagar नावाच्या यूजरने शेअर केला आहे.व्हिडीओला आतापर्यंत 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 94 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय की, नवीन पप्पा खूप क्यूट आहेत.एका अन्य यूजरने म्हटलंय, लव्हली फॅमिली.
नक्की वाचा >> अख्ख्या महाराष्ट्रात या बिझिनेस वुमनची चर्चा, 2467 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक, कोण आहेत अर्चना कुटे?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world