Cute VIDEO: मुलीने दाखवली 'कोरियन हार्ट' साईन; वडिलांच्या रिअ‍ॅक्शनने जग जिंकलं, व्हिडीओ व्हायरल

Father-Daughter Viral VIDEO: वडिलांना मुलीचा इशारा न समजल्यामुळे त्यांना वाटते की मुलगी पैसे मागत आहे. वडील घाईघाईने आपल्या खिशातून 500 रुपये काढून मुलीला देतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

Father-Daughter Viral VIDEO : सध्या सोशल मीडिया वडील आणि मुलीच्या नात्यातील गोडव्याचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सध्या लाखो लोकांच्या चेहऱ्यावर नकळत हास्य आणत आहे. तुम्ही देखील स्क्रोल करताना कदाचित हा व्हिडीओ पाहिला असेल. या व्हिडिओमध्ये मुलीने वडिलांना 'कोरियन हार्ट' साईन दाखवली. पण यावर वडिलांनी दिलेली रिअॅक्शन लोकांचं मन जिंकत आहे. एकदा पाहिला तरी वारंवार पाहावा असाच हा व्हिडीओ आहे.

कोरियन हार्ट आणि वडिलांची प्रतिक्रिया

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी ट्रेनने आपल्या प्रवासाला निघत आहे. तिला निरोप देण्यासाठी आलेल्या वडिलांना ती 'कोरियन हार्ट साइन' बनवून दाखवताना दिसत आहे. हे साइन अंगठा आणि तर्जनी (पहिले बोट) एकमेकांवर क्रॉस करून बनवले जाते. जे आजकालच्या युवा पिढीमध्ये 'प्रेम' दाखवण्यासाठी वापरले जाते. मात्र मुलगी जेव्हा अतिशय प्रेमाने हे हार्ट साइन वडिलांना दाखवते, तेव्हा वडिलांना त्याचा अर्थ समजत नाही. त्यांना वाटते की ती त्यांच्याकडे पैसे मागत आहे.

(नक्की वाचा-  Viral VIDEO: एक फ्लिप अन् सगळ्यांच्या तोंडून निघालं ओsss! आजींच्या भन्नाट डान्स व्हिडीओला 47 लाख व्ह्यूज)

पाहा VIDEO

वडिलांच्या भोळेपणाने मन जिंकलं

वडिलांना मुलीचा इशारा न समजल्यामुळे त्यांना वाटते की मुलगी पैसे मागत आहे. वडील घाईघाईने आपल्या खिशातून 500 रुपये काढून मुलीला देतात. वडिलांची ही साधी-भोळी कृती पाहून व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. वडिलांची ही प्रेमळ आणि निरागस रिअॅक्शन अनेकांना भावली आहे. लोक हा व्हिडीओ पाहून भरभरून कमेंट करत आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  19 मिनिटांच्या व्हायरल व्हिडीओचा विषय काय? VIDEO मिळवण्यासाठी प्रयत्न कराल तर जेलमध्ये जाल)

एका युजरने लिहिले की, "वडील खरोखर किती साधे आणि निरागस असतात!" दुसऱ्याने कमेंट केली की, "वडील-मुलीच्या या बॉन्डला कुणाची नजर न लागो."* या व्हिडिओने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, वडील आणि मुलीचे नाते शब्दांपलीकडील असते.

Topics mentioned in this article