Dog's Justice: एका व्यक्तीनं त्याच्या वाहनानं रस्त्यावरील कुत्र्याला धडक मारली. त्यावेळी कुत्रा पळून गेला. पण, कारचा मालक त्याच्या वाहनातून बाहेर पडून घरी गेला त्यावेळी कुत्र्यानं या कृत्याचा बदला घेतला. त्यानं कारवर चढून दोन्ही पायांनी कारचे ओरबाडे काढण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे. तो पाहून अनेकांना धक्का बसलाय. फक्त माणसंच नाही तर प्राणी (Animal) देखील बदला घेतात, असं हा व्हिडिओ पाहणारे सर्वजण म्हणत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मालकाला काय केलं?
मध्य प्रदेशातील सागर शहरातील ही अजब घटना आहे. सागरमधील एका तरुणानं घरातून बाहेर पडताना कारनं कुत्र्याला धडक दिली. त्यानंतर कुत्र्यांना एक प्रकारे या धडकेचा हिशेब चुकता केला. तो दिवसभर घराच्या बाहेर कार मालकाची वाट पाहात होता. रात्री मालकानं कार घराच्या बाहेर उभी केली होती. रात्री साधारण दीडच्या आसपास कुत्र्यानं पार्क केलेल्या कारला पायानं ओरबाडलं. कुत्र्याची ही कृती घराबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. हे दृश्य पाहून कारच्या मालकाला धक्का बसला आहे. विशेष म्हणजे हा बदला घेणाऱ्या कुत्र्यानं कारचा मालक किवा त्याच्या कुटुंबीयांचं कोणतंही नुकसान केलेलं नाही.
सागर शहरातील तिरुपती कॉलीमध्ये राहणाऱ्या प्रल्हाद सिंह घोषी यांच्या कारबाबत हा प्रकार घडला आहे. 17 जानेवारी रोजी दुपारी 2 च्या सुमारास हे कुटुंबीय कारनं लग्नासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून 500 मीटर दूर अंतरावर कॉलनीमधील एका वळणावर काळ्या रंगाच्या कुत्र्याशी कारची धडक झाली. त्यानंतर ते कुत्रं बरंच अंतर भूकंत कारचा पाठलाग करत होते.
( नक्की वाचा : ऋषभ पंतच्या खांद्यावर कुणाचा हात होता? 6 वर्षानंतर उलगडलं 'त्या' फोटोचं रहस्य )
प्रल्हाद यांनी सांगितलं की, रात्री एक वाजता आम्ही लग्नाहून घरी परतलो आणि कार रस्त्याच्या बाजूला पार्क करुन झोपी गेलो. सकाळी उठल्यावर पाहिलं तर कारच्या चारही बाजूला ओरबडल्याच्या खुणा होत्या. एखाद्या लहान मुलानं दगडानं ओरखडे काढले असतील असा मनात विचार आला. पण, आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिले त्यावेळी एका कुत्रा पायनं ओरडखडे उमटवत असल्याचं दिसलं. सुरुवातीला तर काही समजलं नाही, पण नंतर अचानक याच कुत्र्याची आणि कारची दुपारी धडक झाल्याचं लक्षात आलं.