KBC Video: हुबेहुब चेहरा, तोच अंदाज अन्..'डुप्लिकेट'ला पाहून अमिताभ बच्चनही झाले थक्क, 'असा' प्रश्न विचारला..

Amitabh Bachchan KBC Viral Video : कौन बनेगा करोडपती 17 च्या एका भागात असं काही घडलं की सगळेच थक्क झाले. कॉमेडीचा बादशहा सुनील ग्रोवर यावेळी आपल्या अनोख्या अंदाजात शोमध्ये हजर झाला. व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झालाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Amitabh Bachchan And Sunil Grover Viral Video
मुंबई:

Amitabh Bachchan KBC Viral Video : कौन बनेगा करोडपती 17 च्या एका भागात असं काही घडलं की सगळेच थक्क झाले. कॉमेडीचा बादशहा सुनील ग्रोवर यावेळी आपल्या अनोख्या अंदाजात शोमध्ये हजर झाला. त्याने स्वतःला अमिताभ बच्चन यांच्या लूकमध्ये साकारलं होतं. सूट-बूट, बोलण्याची शैली आणि हावभाव, सगळं अगदी बिग बीं सारखंच होतं. त्याने जसा सेटवर प्रवेश केला, तसं संपूर्ण वातावरण टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलं.

खेळ सुरू असताना एक असा मजेशीर क्षण आला की ज्यामुळे सगळे हसून लोटपोट झाले. सुनीलने पाहिलं की, प्रेक्षकांमध्ये बसलेला एक व्यक्ती बाहेर जायला निघाला आहे. तेव्हा त्याने अमिताभ बच्चन यांच्या शैलीत म्हटलं, 'ए... जोपर्यंत उभं राहायला सांगितलं नाही, तोपर्यंत बसून राहा.' हे ऐकून स्वतः बिग बी देखील थक्क झाले. काही सेकंदांसाठी सेटवर शांतता पसरली आणि सगळ्यांच्या नजरा सुनीलकडे वळल्या.

सुनील ग्रोवर यांचा तो अंदाज पाहून अमिताभही झाले अवाक्..

सुरुवातीला लोकांना समजलं नाही की नेमकं काय घडत आहे, पण जसजसं त्यांना कळलं की, हा सगळा सुनीलचा विनोदी अंदाज आहे, त्यानंतर सेटवर एकच हशा पिकला. अमिताभ बच्चन सुद्धा खळखळून हसल्याचं पाहायला मिळालं. जो व्यक्ती उठून बाहेर जात होता, तोही हसत-हसत परत आपल्या जागेवर बसला. त्यानंतर सुनीलने पुन्हा बिग बींच्या शैलीत म्हटलं, 'चला, या अद्भुत खेळाला सुरुवात करूया.'

नक्की वाचा >>  Viral Video : धावत्या ट्रेनला गरुडाची धडक! काच फोडून आत शिरला, ड्रायव्हर झाला जखमी, पुढे घडलं सर्वात भयंकर..

Advertisement

इथे पाहा अमिताभ बच्चन आणि त्यांच्या डुप्लिकेटचा व्हायरल व्हिडीओ

सुनील ग्रोवरचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या कॉमिक टायमिंग आणि मिमिक्रीचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. कोणी म्हणतंय की, सुनीलने पुन्हा एकदा आपली कला सिद्ध केली आहे, तर कोणी कमेंट्स करतंय की त्यांनी बिग बींच्या अंदाजात चार चाँद लावले. 'केबीसी'चा हा भाग आता लोकांसाठी अविस्मरणीय राहिला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

नक्की वाचा >> Viral Video : दूध, आंघोळ अन् बरंच काही...कुटुंबीयांनी मुलीच्या पहिल्या मासिक पाळीचं केलं भन्नाट सेलिब्रेशन!