Girl's first Period ceremony Video : केरळच्या रेश्मा सुरेश नावाच्या एका महिलेनं इन्स्टाग्रामवर एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एका मुलीच्या पहिल्या मासिक पाळीचं सुंदर सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. या भावनिक व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हिडीओला आतापर्यंत 69 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
दूधाने आंघोळ करून आरती केली
व्हिडीओता पाहायला मिळतंय की, या उत्सवाची सुरुवात दुधाच्या आंघोळीने होते. त्यानंतर कुटुंबातील महिला आणि पुरुष सदस्य मुलीला फुलांच्या माळ्या घालतात आणि तिची आरती करतात. यादरम्यान सर्वांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंदाची मोहोर उमटलेली दिसते. पारंपरीक पद्धतीत हे आशीर्वाद आणि सौभाग्याचं प्रतिक मानलं जातं.
हळदी आणि मिठाईनेही केलं सेलिब्रेशन
त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीच्या शरीरावर हळदीचा लेप लावला. जे शुद्धता आणि नवीन जीवनाच्या स्वागताचं प्रतिक मानलं जातं. हे रितीरिवाज केल्यानंतर मुलगी तयार होते. त्यानंतर कुटुंबातील सदस्य तिला मिठाई खायला देतात आणि हा क्षण अविस्मरणीय करतात.
नक्की वाचा >> बसमध्ये महिलेच्या गुप्तांगाला गुपचूप स्पर्श केला..महिलेनं व्हिडीओ काढून वासनांधाच्या कानाखाली जाळ काढला अन्..
सोशल मीडियावर लोकांनी केलं कौतुक
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी याला 'नारीत्व का उत्सव' असं म्हटलंय. एका यूजरने म्हटलंय, ती मोठी व्हावी, ती चककावी, तिचा उद्धार व्हावा..अन्य एका यूजरने म्हटलंय, किती सुंदर मेसेज, एखाद्या स्त्रीला दिलेला खूप चांगला मान सन्मान, दरम्यान, हे पहिल्यांदाच घडलं नाहीय. अशाप्रकारचे व्हिडीओ याआधीही व्हायरल झाले आहेत. यापूर्वी सप्टेंबरमध्ये आयुषा नावाच्या मुलीनं तिच्या पहिल्या पीरिएड्सच्या वेलकम सेरेमनीचा व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये तिचे कुटुंबीय खुश झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
नक्की वाचा >> 'या' देशातील महिला राष्ट्रपतींचा विनयभंग! छातीला स्पर्श, किस अन्..तरुणाचं संतापजनक कृत्य! Video व्हायरल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world