जाहिरात

Viral Video : धावत्या ट्रेनला गरुडाची धडक! काच फोडून आत शिरला, ड्रायव्हर झाला जखमी, पुढे घडलं सर्वात भयंकर..

Eagle Hits Running Train Viral Video :  धावत्या ट्रेनला एखादा प्राणी, गाडी किंवा अन्य काही गोष्टीची धडक लागली, तर ट्रेनचं मोठं नुकसान होतं. पण जम्मू काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गरुडाने ट्रेनला धडक दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

Viral Video : धावत्या ट्रेनला गरुडाची धडक! काच फोडून आत शिरला, ड्रायव्हर झाला जखमी, पुढे घडलं सर्वात भयंकर..
Eagle Attack On Train
मुंबई:

Eagle Hits Running Train Viral Video :  धावत्या ट्रेनला एखादा प्राणी, गाडी किंवा अन्य काही गोष्टीची धडक लागली, तर ट्रेनचं मोठं नुकसान होतं. पण जम्मू काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका सुसाट धावणाऱ्या ट्रेनने गरुडाला धडक दिली. पण आश्चर्यकारक बाब म्हणजे, गरुडाला धडक लागल्यानंतर इंजिनच्या समोरची काच तुटली आणि गरुड आतमध्ये घुसला. गरुडाला बसलेली धडक इतकी जोरदार होती की, केबिनच्या काचेचा अक्षरश: चक्काचूर झाला. गाडीत असलेला ड्रायव्हरही जखमी झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत पाहू शकता की, ट्रेनची गरुडाला धडक लागल्यानंतर इंजिनच्या काचेचे तुकडे झाले. त्यानंतर गरूड इंजिनमध्ये वेगाने घुसला आणि त्याचदरम्यान ड्रायव्हर जखमी झाला. या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात एक गरुड ट्रेनच्या विंडस्क्रीनला धडकलं आणि तो पक्षी लोकोमोटीव्ह पायलटच्या केबिनमध्ये घुसला. ज्यामुळे ट्रेनचा ड्रायव्हर जखमी झाला.

नक्की वाचा >> Manoj Jarange Murder Plan: धनंजय मुंडेंचं काय खरं नाय! मनोज जरांगेंची SP कार्यालायत धाव, 'त्या' 15 लोकांनी..

बारामूला-बनिहाल ट्रेनसोबत घडली घटना

या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी पुढे म्हटलं की, ही घटना बारामूला-बनिहाल ट्रेनमध्ये बिजबेहरा आणि अनंतनाग रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. गरुडाने धडक दिल्याने विंडस्क्रीन तुटलं. ज्यामुळे ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर किरकोळ जखमा झाल्या. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा भयानक व्हिडीओ पाहून लोकांना धक्काच बसला आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की, ट्रेन आणि गरुड वेगाने जात असल्याने जोदराद धडक बसली. त्यामुळे ट्रेनची विंडस्क्रीन तुटली.

नक्की वाचा >> महिलांनो! चुकीच्या पद्धतीने लघवी करता? 'ही' आहे Urine करण्याची योग्य पोजिशन, अजिबात होणार नाही इन्फेक्शन!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com