Dr A.P.J Abdul Kalam Marathi Video Viral: आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम उपस्थितांशी मराठी भाषेतून संवाद साधत असल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर त्यांनी मराठी भाषेतून संवाद साधण्यापूर्वी राशपचे अध्यक्ष शरद पवार यांचा देखील विशेष उल्लेख केला. माजी राष्ट्रपती कलाम यांनी मराठी भाषेतून संवाद साधायला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. या व्हिडीओतील त्यांचे मराठी शब्दांचे उच्चार स्पष्ट आणि आदरपूर्ण आहेत. काही सेकंदांचा असलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरतोय.
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी मराठी भाषेतून नेमका काय संवाद साधला? पाहा व्हिडीओ ( Dr A.P.J Abdul Kalam Marathi Speaking Video Viral)
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा हा व्हिडीओ त्यांच्या साधेपणाचा आणि सर्वसमावेशकतेचा दाखला आहे.
(नक्की वाचा:Viral video: बाईंचा वेगळाच पॅटर्न, शिक्षिकेचा चिमुकल्यांसह भन्नाट डान्स भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (Dr APJ Abdul Kalam) यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. ते एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ देखील होते. विज्ञान क्षेत्रातील त्यांचे काम आणि योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या देखरेखीअंतर्गत भारताने 1998 रोजी पोखरण येथे दुसऱ्यांदा यशस्वी अणुचाचणी केली होती. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार देखील जाणून घेऊया... डॉ. कलाम यांचे विज्ञान क्षेत्रातील विशेष योगदान