
Dr A.P.J Abdul Kalam Marathi Video Viral: आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम उपस्थितांशी मराठी भाषेतून संवाद साधत असल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर त्यांनी मराठी भाषेतून संवाद साधण्यापूर्वी राशपचे अध्यक्ष शरद पवार यांचा देखील विशेष उल्लेख केला. माजी राष्ट्रपती कलाम यांनी मराठी भाषेतून संवाद साधायला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. या व्हिडीओतील त्यांचे मराठी शब्दांचे उच्चार स्पष्ट आणि आदरपूर्ण आहेत. काही सेकंदांचा असलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरतोय.
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी मराठी भाषेतून नेमका काय संवाद साधला? पाहा व्हिडीओ ( Dr A.P.J Abdul Kalam Marathi Speaking Video Viral)
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा हा व्हिडीओ त्यांच्या साधेपणाचा आणि सर्वसमावेशकतेचा दाखला आहे.
(नक्की वाचा:Viral video: बाईंचा वेगळाच पॅटर्न, शिक्षिकेचा चिमुकल्यांसह भन्नाट डान्स)
डॉ. कलाम यांचे विज्ञान क्षेत्रातील विशेष योगदान
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (Dr APJ Abdul Kalam) यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. ते एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ देखील होते. विज्ञान क्षेत्रातील त्यांचे काम आणि योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या देखरेखीअंतर्गत भारताने 1998 रोजी पोखरण येथे दुसऱ्यांदा यशस्वी अणुचाचणी केली होती. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार देखील जाणून घेऊया...
- "स्वप्न तेव्हाच खरी होतात, जेव्हा आपण स्वप्न पाहणे सुरू करतो."
- "प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येतात, केवळ या दुःखांमध्येच प्रत्येकाच्या संयमाची परीक्षा होते."
- "जीवनात आनंद तेव्हाच अनुभवता येतो जेव्हा ते सुख अडचणींमधून प्राप्त होतात."
- "शिखर गाठण्यासाठी ताकद असावी लागते, मग ते माऊंट एव्हरेस्ट असो किंवा अन्य कोणतेही ध्येय असो."
- "यशाच्या मार्गावर जर आपल्या हाती निराशा आली तर याचा अर्थ असा नव्हे की आपण प्रयत्न करणे थांबवावे, प्रत्येक निराशा आणि अपयशामागे यश लपलेले असते."
- "झोपल्यानंतर तुम्ही जे पाहता ती स्वप्ने नसतात, स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत."
- "विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजे, हा विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम गुण आहे."
- "जर एखाद्या देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचे असेल, तर मला वाटते की आपल्या समाजात तीन लोक असे आहेत जे हे करू शकतात. ते म्हणजे आई, वडील आणि शिक्षक."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world