Traffic Police Viral Video: बाईक चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. हेल्मेट वापरल्याने कोणत्याही दुर्घटनेपासून आपला जीव वाचतो. त्यामुळेच वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटची सक्ती केली जाते. हेल्मेट न वापरल्यास दंडही भरावा लागतो, तरीही अनेकजण विना हेल्मेट गाडी चालवताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विना हेल्मेट गाडी चालवताना पकडल्यानंतर असे काही कारण सांगितले की पोलिसही सुन्न झाले.
हेल्मेट का घातले नाही?
सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल असतात, त्यापैकी काही व्हिडिओ इतके मजेशीर अन् अवाक करणारे असतात की नेटकऱ्यांनाही वेड लावतात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. विना हेल्मेट गाडी चालवताना पकडल्यानंतर काकांनी वाहतूक पोलिसांना असे काही उत्तर दिले की पोलिसांनाही क्षणभर धक्का बसला.
Good News: चालकांनो! इंटरनेट आणि डेटा नसतानाही नेव्हिगेशन चालणार, 'असं' वापरा Offline Maps
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक काका गाडीवरुन विना हेल्मेट जात असतात. त्यांना पाहताच तात्काळ वाहतूक पोलीस गाडी थांबवतात आणि हेल्मेट का घातले नाही? असा सवाल करतात. मात्र यावर काकांनी दिलेले उत्तर चकित करणारे होते. माझ्या डोक्याला बसेल असे हेल्मेटच मिळत नाही, कोणत्याच कंपनीचे हेल्मेट बसत नाही, मी काय करु? असं ते म्हणतात.
पोलिसांनी हात जोडले..
काकांनी केलेला हा अजब दावा ऐकून पोलीसही क्षणभर अवाक होतात. महत्त्वाचं म्हणजे ते काकांची उलटतपासणीही करतात. पोलिस तात्काळ त्यांच्याकडचे हेल्मेट काकांना देतात. मात्र काकांना ते हेल्मेटसुद्धा बसत नाही. शेवटी पोलिस मजेशीर पद्धतीने कंपनीलाच विनंती करत काकांच्या डोक्याला बसेल अशी हेल्मेट वापरावे असे आवाहन केले. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.
नक्की वाचा >> 100 मीटर अंतर राहिलं होतं..तितक्यात कॅब ड्रायव्हरच्या मनात नको ते शिजलं, महिलेनं लगेच व्हिडीओ बनवला अन्..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world