नाश्ता आणि कॉफी आणण्यासाठी नकार दिल्याने नव्याने रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्याला बॉसने कामावरुन काढून टाकलं आहे. चीनमधील एका नामांकित कंपनीत हा प्रकार घडला आहे. जियाओहोंगशू नावाच्या एका चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने याबाबतची पोस्ट केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हायरल झालेल्या या पोस्टनुसार, लू नावाची महिला या कंपनीत नव्याने रुजू झाली होती. त्याच ठिकाणी उच्च पदावर असलेल्या तिचा बॉस लियू याने तिला नाश्त्यात 'हॉट अमेरिकनो आणि ऑम्लेट' आणायला सांगितलं. एकदाच नव्हेतर रोज हा नाश्ता आणण्यास सांगितलं. मात्र महिलेने बॉसला नाश्ता आणण्यास स्पष्ट नकार दिला.
(नक्की वाचा- वरिष्ठाने सुट्टी नाकारली, 30 वर्षांच्या महिलेचा ऑफिसमध्येच मृत्यू)
यामुळे या महिला कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं. कंपनीच्या एचआर विभागाने कर्मचाऱ्याने तक्रार करुन याबाबत योग्य तोडगा काढण्याची मागणी केली. मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. कोणतीही भरपाई न देता कंपनी लू यांना नोकरी सोडण्यास सांगितलं.
सोशल मीडियावर ही याबाबतची पोस्ट व्हायरल झाल्यानंतरनेटिझन्सनी संबंधित कंपनीवर टीकेची झोड उठवली. घटनेची अंतर्गत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांशी अशी वागणूक अस्वीकार्य असल्याचे मत अनेकांनी मांडले आणि कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.
( नक्की वाचा : पुण्यातील 'त्या' महिला कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे व्यवस्थेत मोठा बदल होणार? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल)
ऑनलाइन टीका होत असल्याने कंपनीला प्रतिसाद देणे भाग पडले. लोकांच्या वाढत्या दबावाखाली, कंपनीने नोकरीवरून काढून टाकलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुन्हा नोकरीवर घेण्याचा निर्मय घेतला. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची खात्री करण्यासाठी पावले उचलली जातील, असं आश्वासनही कंपनीने दिलं आहे.