
Man Crushed EX Girlfriend By Activa Viral Video: प्रेम प्रकरणातून, हत्या, वाद, आत्महत्या अशा अनेक घटना ऐकायला मिळतात. सोशल मीडियावर अशा घटनांचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. इंदोर शहरात ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका तरुणाने आपल्या Ex-Girlfriend च्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.
तरुणीने पुन्हा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live-in Relationship) राहण्यास नकार दिल्याने तिच्यावर भर रस्त्यात भरधाव वेगाने स्कूटर (Activa) घालून तिला गंभीर जखमी केले. ही घटना घडल्यानंतर आरोपी त्वरित घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. (Indore Girlfriend Boyfriend Viral Video)
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवार संध्याकाळी कल्पना नगर परिसरात घडली, अशी माहिती हीरानगर पोलीस स्टेशनचे प्रभारी सुशील पटेल यांनी दिली. पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत सांगितले की, आरोपी राजेंद्र चौरसिया तिच्यावर खूप दिवसांपासून पुन्हा सोबत राहण्यासाठी दबाव टाकत होता. बुधवारी त्याने तरुणीला रस्त्यात थांबवले आणि पुन्हा एकत्र राहण्याचा हट्ट धरला, ज्याला तरुणीने तीव्र विरोध केला (Girlfriend Refused Live in Live in Relationship) यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
Ex-Boyfriend rammed scooty on Ex-Girlfriend
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 25, 2025
pic.twitter.com/Cu0eEm4zxX
वाद झाल्यानंतर आरोपी राजेंद्र संतापाने तेथून निघून गेला, पण काही वेळातच तो भरधाव वेगाने आपली ॲक्टिव्हा घेऊन परतला आणि त्याने थेट तरुणीला धडक मारली. तरुणीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत एक दगडही उचलला, पण आरोपीने गाडीचा वेग कमी केला नाही आणि तिला जोरदार टक्कर मारून तो फरार झाला. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने तरुणीला उचलले आणि तिला उपचारासाठी नेले.
ही संपूर्ण घटना जवळच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Footage Goes Viral) कैद झाली आहे, जे फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजेंद्र चौरसिया याच्याविरुद्ध छेडछाड आणि हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हे देखील स्पष्ट केले की, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीच ७ गुन्हे दाखल आहेत. सध्या पोलीस पथके आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world