जाहिरात

Suraj Chavan Wedding: सुरजची हळद जान्हवीने गाजवली! 'झापुक झुपूक'वर तुफान नाचली; पाहा VIDEO

Suraj Chavan Wedding Viral Video: सुरजच्या हळदीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बिग बॉस 5 मधील कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या डान्सने सर्वांनाच वेड लावले. 

Suraj Chavan Wedding: सुरजची हळद जान्हवीने गाजवली! 'झापुक झुपूक'वर तुफान नाचली; पाहा VIDEO

Suraj Chavan wedding Jahnavi Killekar Dance VIDEO: बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता, झापुकझुपूक फेम सुरज चव्हाणचा विवाह सोहळा आज पार पडणार आहे. सासवडमध्ये सुरज चव्हाण मामाच्या मुलीशी म्हणजेच संजना गोफणेशी लग्नगाठ बांधणार आहे. सुरजच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून लग्नापूर्वीचे विधी म्हणजेच घाणा, हळदीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. काल सुरजची हळद पार पडली. या हळदी समारंभात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने जबरदस्त डान्स केला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

सुरज चव्हाणच्या हळदीत जान्हवीचा कडक डान्स...

झापुक झूपूक फेम सुरज चव्हाणचा विवाह सोहळा अवघ्या काही तासांवर आला आहे. सासवडजवळील हॉलमध्ये सुरजचा लग्नसोहळा होणार असून  राजकीय नेते मंडळींसह सिने विश्वातील दिग्गज सेलिब्रेटी या विवाह सोहळ्याला हजर असतील. त्याआधी शुक्रवारी रात्री सुरजच्या हळदीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बिग बॉस 5 मधील कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या डान्सने सर्वांनाच वेड लावले. 

Suraj Chavan Wedding: अरेंज नव्हे, लव्ह मॅरेज..! सुरज चव्हाणची गुलिगत लव्हस्टोरी, वाचा प्रपोजचा खास किस्सा

सुरजने लग्नाआधी काही दिवसांपूर्वीच आपल्या नव्या घरात प्रवेश केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरजला घर बांधून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. याच नव्या घरात आता सुरजच्या लग्नाचे सर्व विधी पार पडत असून होणाऱ्या बायकोचं जल्लोषात स्वागत करणार असल्याचे सूरजने सांगितले आहे. आज सुरजच्या लग्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सिनेविश्वातील बडे कलाकार उपस्थित राहणार आहेत. अभिनेता रितेश देशमुख, अक्षय कुमार याच्यासह बिग बॉस 5 मधील सर्व कलाकार येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

लग्नाला सेलिब्रेटींची गर्दी..

दरम्यान, सुरज चव्हाण आणि त्याची होणारी पत्नी संजना यांचं लव्ह मॅरेज आहे. संजना ही सुरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते, दोघांची घट्ट मैत्री होती याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. घरच्यांच्या संमतीने दोघेही आता विवाह बंधनात अडकत आहेत. सुरजच चव्हाणचे लग्न मोठा  सेलिब्रिटी इव्हेंट ठरणार असून आता कोण-कोण लग्नाला येणार याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com