जाहिरात

बाप-लेकीची हृदयस्पर्शी गोष्ट! मुलीला कुशीत घेऊन चालवतोय रिक्षा; 'हा' VIDEO पाहून डोळे पाणावतील

Rickshaw Driver Father And Daughter Viral Video: हा रिक्षावाला आपल्या चिमुकलीला घेऊन रिक्षा चालवण्याचं काम करत आहे. ज्यामागचे  कारण खूपच हदयस्पर्शी आहे. 

बाप-लेकीची हृदयस्पर्शी गोष्ट! मुलीला कुशीत घेऊन चालवतोय रिक्षा; 'हा' VIDEO पाहून डोळे पाणावतील

Rickshaw Driver Father And Daughter Emotional Story: आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या सुखासाठी दिवसरात्र राबणारा देवमाणूस म्हणजे बाप. जन्म देणारी जरी आई असली तरी लेकराला संस्काराची शिदोरी देत कष्टाने, स्वाभिमानाने जगायला शिकवणारा बापच असतो. अशाच बाप-लेकीचा काळजाला भिडणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुमचेही डोळे पाणावतील. काय आहे हा नेमका व्हिडिओ? जाणून घ्या..

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी भयंकर अपघाताचे, कधी भन्नाट डान्सचे तर कधी तुफान हाणामारीचे हे व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. मात्र सध्या एका रिक्षा चालकाच्या व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. हा रिक्षावाला आपल्या चिमुकलीला घेऊन रिक्षा चालवण्याचं काम करत आहे. ज्यामागचे  कारण खूपच हदयस्पर्शी आहे. 

 राकेश अशोक जाधव हे मुंबईच्या माहुल गाव चेंबूरमध्ये राहणारे रहिवासी. राकेशजी रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात. त्यांची चिमुकली मुलगी नऊ महिन्यांची असतानाच त्यांच्या पत्नीचं निधन झाले. तेव्हापासून राकेश यांनी एकट्याने आपल्या चिमुकलीचा सांभाळ केला. तिला सोबत घेऊनच ते आपली रिक्षा चालवतात. आता त्यांची लाडकी लेक २ वर्ष सहा महिन्यांची झाल्याचं त्यांनी सांगितले. 

रिक्षामध्ये  बसलेल्या भागेश साळुंखे या प्रवाशाने बाप-लेकीची ही काळजाला चटका लावणारी कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी या आभाळाएवढं मन असणाऱ्या बापाचा अन् भाग्यवान मुलीचा सुंदर व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या असून अनेकजण ही कहाणी पाहून भावुक झालेत. 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भावेश साळुंखे यांनी उतरताना राकेश जाधव यांच्या हातात ५०० रुपयांची नोटही ठेवली. अशा ग्रेट बाप माणसाला सलाम असं म्हणत त्यांनी राकेश ज्यांच्या या जिद्दीच अन् संघर्षाचं कौतुक केलं आहे. दरम्यान, हा व्हिडिओ पाहून मीडिया जगतही भावुक झालं आहे. अनेकांनी राकेश जाधव यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी एक बाप आपल्या लेकीसाठी काहीही करु शकतो, अशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

Mumbai Metro : मुंबईकरांच्या संतापाचा उद्रेक, ऐन गर्दीत रोखली मेट्रो, पाहा Video

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com