Wedding Viral Video: पंजाबमधील पारंपरिक नृत्य भांगडाचे संगीत वाजल्यानंतर कोणीही आपोआपच नाचू लागते. या नृत्य प्रकारामध्ये इतकी ऊर्जा असते की तुम्ही कोणालाही भांगडा करताना पाहिलं तर स्वतःलाही डान्स करण्यापासून रोखू शकत नाही. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये नवऱ्यामुलासोबत असेच काहीसे घडल्याचे दिसतंय. जेव्हा भांगड्याचे संगीत सुरू झाले तेव्हा तो स्वतःला भांगडा करण्यापासून रोखू शकला नाही आणि मित्रासोबत त्याने देखील ठेका धरला. नवऱ्यामुलाला नाचताना पाहून नवऱ्यामुलीने ताल धरला आणि मित्रासोबत दोघंही डान्स करू लागले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवरा-नवरीचा धमाकेदार डान्स
युट्यूब शॉर्ट्समध्ये शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये लग्नसमारंभात नवऱ्याचा मित्र स्टेजवर जाऊन नवरा-नवरीसमोर जबदरस्त भांगडा करण्यास सुरुवात करतो. पारंपरिक संगीत आणि मित्राचा जबरदस्त डान्स पाहून नवरामुलगा देखील त्याच्यासोबत डान्स करू लागला. मग दोघांनी मिळून देसी शैलीमध्ये धमाकेदार भांगडा केला. भन्नाट भांगडा स्टेप्स करुन या दोघांनी मैफल जमवली. दोघांना नाचताना पाहून नवरीमुलगी डान्स करण्यासाठी त्यांच्यासोबत सहभागी झाली.
(नक्की वाचा: एण्ट्रीवर डीजवाल्याने चुकीचे गाणं लावल्याने नववधू भडकली, VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले- बरं झालं!)
डान्सचे होतेय कौतुक
युट्यूबवर या व्हिडीओला नेटकऱ्यांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दीड लाख लोकांनी हा व्हिडीओ लाइक केलाय. या तिघांच्या भांगडा डान्सचे कौतुक केले जात आहे. नवऱ्यामुलीचे विशेष कौतुक होताना दिसतंय.
(नक्की वाचा: स्वतःच्याच लग्नात नववधूचा काजोलच्या गाण्यावर धमाकेदार डान्स! पाहणाऱ्यांच्या अंगावर आले शहारे, लग्नच विसरले)