जाहिरात

VIDEO: एक दोन नव्हे 27 साप.. पाण्याच्या टाकीत पाहिलं अन् बोबडीच वळली; धडकी भरवणारा व्हिडिओ

एवढ्या मोठ्या संख्येने सापांची पिल्ले पाहून घरात घबराट पसरली. ही पिल्ले कुठून आली किंवा आता काय करावे, हे त्यांना सुचत नव्हते. त्यांनी तात्काळ जवळच्या गावकऱ्यांना याची माहिती देण्यात आली.

VIDEO:  एक दोन नव्हे 27 साप.. पाण्याच्या टाकीत पाहिलं अन् बोबडीच वळली; धडकी भरवणारा व्हिडिओ

Snake In Water Tank Viral Video:  साप पाहिला की भल्याभल्यांची बोबडी वळते, प्रत्येकाचीच पळता भुई थोडी होते. म्हणूनच आपल्या घराच्या आसपास साप येऊ नये म्हणून परिसरात स्वच्छता ठेवतात. मात्र उत्तराखंडच्या हरिद्वारमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. हरिद्वारमध्ये एका इमारतीवर असलेल्या पाण्याच्या टाकीत एक दोन नव्हे तर तब्बल २७ साप आढळल्याने खळबळ उडाली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

China News : चीनमध्ये परीक्षेच्या दिवशी महिला फक्त लाल रंगाचेच कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल थक्क

बाप रे बाप, तब्बल 27 साप.. 

समोर आलेल्या माहितीनुसार, हरिद्वारच्या ज्वालापूर भागातील एका घरातील पाण्याच्या टाकीत डोकावून पाहिल्यावर घरातील सदस्यांची बोबडीच वळली. कारण टाकीमध्ये  डझनभर सापांची पिल्ले सरपटत होती. एवढ्या मोठ्या संख्येने सापांची पिल्ले पाहून घरात घबराट पसरली. ही पिल्ले कुठून आली किंवा आता काय करावे, हे त्यांना सुचत नव्हते. त्यांनी तात्काळ जवळच्या गावकऱ्यांना याची माहिती देण्यात आली.

ही माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी जमली. टाकीमध्ये सापांची पिल्ले पाहून गावकरीसुद्धा चकित झाले. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. वन विभागासोबत आलेल्या सर्पमित्र तालिबा आणि भोला यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि मोठ्या मेहनतीने सापांच्या पिल्लांना टाकीतून बाहेर काढले. 

वन विभागाच्या मदतीने जंगलात सोडले 

रेंज ऑफिसर शीशपाल सिंग यांनी सांगितले की, बचावकार्यादरम्यान एकूण २७ सापांची पिल्ले ताब्यात घेण्यात आली. त्या सर्वांना सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्यात आले. बचावकार्यादरम्यान घटनास्थळी मोठ्या संख्येने स्थानिक लोक उपस्थित होते. साप पकडण्याची संपूर्ण प्रक्रिया लोकांसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे. पाण्याच्या टाकीत सापांची एवढी पिल्ले कशी आली, यावर लोक चर्चा करत आहेत. कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनवर चित्रित केला, जो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

साप पकडणारे तालिब यांनी स्पष्ट केले की, हे साप 'चेकर्ड कीलबॅक' प्रजातीचे आहेत, ज्यांना पाणसाप म्हणूनही ओळखले जाते. ही एक अर्ध-जलचर प्रजाती आहे जी प्रामुख्याने पाण्याच्या स्रोतांच्या आसपास आढळते. बचावकार्यानंतर, पथकाने सर्व सापांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी सोबत नेले, ज्यामुळे घरातील रहिवाशांना दिलासा मिळाला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पाण्याच्या टाकीत एवढे साप कसे आले, याबद्दल लोक अत्यंत गोंधळलेले आहेत. जर याची वेळेवर माहिती दिली नसती, तर एक मोठी दुर्घटना घडू शकली असती. 

( नक्की वाचा : फुटबॉल प्रेमींसाठी गूड न्यूज! 1 रुपयाही खर्च न करता मोबाईल, टीव्हीवर फ्री दिसणार FIFA World Cup 2026 चे सामने )

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com