
Porsche Car Viral News: जे लोक प्रेमाच्या नाते बांधले गेलेले असतात, त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाइन डे असतो आणि त्यांच्यामध्ये कायम प्रेम पाहायला मिळते. विशेषतः पती-पत्नीचे नात्यामध्ये कितीही भांडणं होत असली तरीही त्यांच्यातील प्रेम काही केल्या कमी होत नाही. ज्या पती-पत्नीमध्ये वादच होत नसतील तर मग ती मंडळी औपचारिकता म्हणून त्यांचे नाते जपत असतील. पण कधी-कधी नात्यातील कटुता इतकी वाढते की सारं काही संपुष्टात येते. याचेच एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नेमका काय आहे प्रकार, जाणून घेऊया. व्हॅलेंटाइन डेनिमित्त पतीने पत्नीला महागडी कार गिफ्ट म्हणून दिली. पण पत्नीने गिफ्ट घेण्यास थेट नकार दिला. यामुळे भडकलेल्या पतीने कोट्यवधींची कार थेट कचऱ्यात फेकून दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पतीने कचऱ्यात फेकली महागडी कार
रिपोर्ट्सनुसार, हे वृत्त रशियामधील आहे. येथे एका व्यक्तीने पत्नीसोबतच्या नात्यातील कडवटपणा दूर करण्यासाठी तिला महागडी पोर्शे कार गिफ्ट केली होती. या गाडीची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचे म्हटलं जात आहे. पण त्याच्या पत्नीला हे प्रेम नाही तर तिचा केलेला अपमान वाटला, त्यामुळे तिने गिफ्ट स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे पतीला राग आला आणि त्याने महागडी कार कचऱ्यात फेकली. तब्बल 12 दिवस ही कार कचऱ्यात पडून होती. कचऱ्यात फेकलेल्या नव्याकोऱ्या कारचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
(नक्की वाचा: नोएडातील न्यूज चॅनलमध्ये IIT बाबाला मारहाण, Video शेअर करत केले अनेक आरोप)
नेटकरी काय म्हणाले?
एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर कचऱ्यात पडलेल्या या कारचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं की, "एका रशियन माणसाने महागडी पार्शे कार कचऱ्यात फेकली. कारण व्हॅलेंटाइन डेनिमित्त त्याच्या पत्नीने ही कार स्वीकारण्यास नकार दिला." या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरने म्हटलंय की,"एकट्या माणसाने गाडी कचऱ्यात फेकली हे पाहून मी प्रभावित झालोय, पण मला त्या माणसाबाबत वाईटही वाटतंय. त्याला अशा व्यक्तीने नाकारलंय जिने त्याचा कधी आदर केला नाही किंवा त्याच्यावर प्रेमही केले नाही" आणखी एका युजरने लिहिलंय की, "कदाचित महिलेला रंग आवडला नसावा".
(नक्की वाचा : Viral Video : सोनाली बेंद्रेचा राज ठाकरेंना एक इशारा; सोशल मीडियावर धुमाकूळ)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world