जाहिरात

कॅब ड्रायव्हरची भन्नाट आयडिया! पोस्टर वाचून जोडपे लाजून चार हात लांब बसतील

Social Media Viral : प्रेमीयुगुलांच्या कॅबमधील रोमान्समुळे हैराण होऊन या कॅब ड्रायव्हरने आपल्या कॅबमध्ये हे पोस्टर लावलं असावं. याद्वारे कॅब ड्रायव्हरने प्रेमीयुगुलांना अंतर राखण्याचं आणि रोमान्स न करण्याचा सल्ला दिला आहे.

कॅब ड्रायव्हरची भन्नाट आयडिया! पोस्टर वाचून जोडपे लाजून चार हात लांब बसतील
Hyderabad Cab driver Viral Photo

Viral Cab Driver Note:

हैदराबादमधील एका कॅब ड्रायव्हरशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ड्रायव्हरने आपल्या कॅबमध्ये बसलेल्या प्रवाशांसाठी सीटच्या समोर एक पोस्टर लावलं आहे. हे पोस्टर इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रेमीयुगुलांच्या कॅबमधील रोमान्समुळे हैराण होऊन या कॅब ड्रायव्हरने आपल्या कॅबमध्ये हे पोस्टर लावलं असावं. याद्वारे कॅब ड्रायव्हरने प्रेमीयुगुलांना अंतर राखण्याचं आणि रोमान्स न करण्याचा सल्ला दिला आहे.

(नक्की वाचा- सूरज चव्हाणची 'सबसे कातील' फॅन, गौतमी पाटील सोबतचा VIDEO तुफान व्हायरल)

पोस्ट पाहा

कॅब ड्रायव्हरने प्रेमी जोडप्यांना कॅबमध्ये रोमान्स न करण्याचा इशारा दिला आहे. कॅबमधील पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅब ड्रायव्हरने पोस्टरवर लिहिले आहे की, "Warning! रोमान्स करू नका. ही कॅब आहे, तुमची खाजगी जागा किंवा OYO नाही. त्यामुळे कृपया अंतर ठेवा आणि शांत रहा." या मेसेजवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

(नक्की वाचा-  गुगल लोकेशनने दिला धोका, प्रेयसीऐवजी तिच्या आईच्या खोलीत पोहोचला प्रियकर; अन्...)

एक्स अकाऊंट @HiHyderabad वर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 86 हजारहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली असून 1500 हून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे.