जाहिरात

'अरे बापरे, मी हे काय खाल्लं?' वाढदिवशी शिकागोमध्ये 40 हजार रुपयांचं केलं जेवण, Video सोशल मीडियावर व्हायरल

रिव्ह्यू शेअर करणाऱ्या अनुष्कने सांगितलं की, त्याने शिकागोच्या रेस्टॉरंटमध्ये तब्बल ४० हजार रुपयांचा शाकाहारी मेन्यू ट्राय केला.

'अरे बापरे, मी हे काय खाल्लं?' वाढदिवशी शिकागोमध्ये 40 हजार रुपयांचं केलं जेवण, Video सोशल मीडियावर व्हायरल

review of Indienne famous Michelin-starred restaurant in Chicago : सध्या इंटरनेटवर भारतीय व्यक्तीने केलेल्या एका रिव्ह्यूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  हा review शिकागोच्या प्रसिद्ध मिशेलिन स्टार रेस्टॉरंट Indienne चा आहे. इन्स्टावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यूअरने आपल्या फाइन-डायनिंगचा अनुभव अत्यंत मजेशीर पद्धतीने सांगितला. लोकांनाही तरुणाच्या रिव्ह्यूची पद्धत आवडत आहे. रिव्ह्यू शेअर करणाऱ्या अनुष्कने सांगितलं की, त्याने शिकागोच्या रेस्टॉरंटमध्ये तब्बल ४० हजार रुपयांचा शाकाहारी मेन्यू ट्राय केला. व्हिडिओच्या सुरुवातीला त्याने सांगितलं, त्याच्यासाठी हा पैसे वसूल करणारा अनुभव आहे. 

१०-कोर्सचा शाकाहारी मेनू

अनुष्कने १०-कोर्स शाकाहारी मेनूची ऑर्डर दिली होती. यावेळी त्याने ढोकळा, पाणीपुरी, दही चाट, मेदू वडा आणि इतर अनेक पदार्थांची चव घेतली. मेन्यूमध्ये पदार्थांबद्दल जास्त तपशील दिलेले नव्हते, ज्यामुळे त्यांची खरी चव अंदाज लावणं कठीण झालं होतं. याची सुरुवात वाइनपासून झाली. मात्र तो वाइन पित नसल्याने त्याने स्पिरिट-फ्री ड्रिंक निवडलं. जेवणाचा अनुभव देणारा व्हिडिओदेखील त्याने अनोख्या पद्धतीने शूट केला आहे. सुरुवातील त्याचा टेबलक्लॉथ इस्त्री करण्यात आला आणि नंतर त्याला विविध पदार्थ सर्व्ह करण्यात आले. वाढदिवस असल्याने त्याला एक मोफत पेय देखील देण्यात आले. 

हॉटेलमध्ये दिलेल्या सर्व्हिसचं केलं कौतुक

अनुष्कने रेस्टॉरंटमध्ये दिलेल्या सेवेचं कौतुक केलं. त्याने सांगितलं, जेवत असताना मधे तो वॉशरुमला जायला उठला. तो परतला तर त्याच्या टेबलावर नॅपकिन पुन्हा व्यवस्थित फोल्ड करून ठेवला होता. यामुळे तो हैराण झाला. तो पुढे म्हणतो, शिकागोमध्ये मी आतापर्यंतचा सर्वात चांगले पदार्थ चाखले. साध्या वाटणाऱ्या भारतीय डिशेस इतक्या क्रिएटिव्हपणे सादर केल्या जाऊ शकतात, याचा कधी विचारली केला नाही. 

Indienne रेस्टॉरंटबद्दल थोडंस...

 Indienne हे शिकागोच्या रिव्हर नॉर्थ डिस्ट्रिक्टमध्ये स्थित आहे आणि २०२२ मध्ये शेफ सुजन सरकार यांनी सुरू केलं. हे रेस्टॉरंट १९ व्या शतकातील एका सुंदर प्रिंटिंग वेअरहाऊसमध्ये आहे. येथे भारतीय पदार्थ फ्रेंच पद्धतीने सर्व्ह केले जाते. २०२३ मध्ये त्याला मिशेलिन स्टार मिळाला, जो शिकागोमधील कोणत्याही  भारतीय रेस्टॉरंटला पहिल्यादा मिळाला होता. तेव्हापासून, हे रेस्टरंट अमेरिकेत भारतीय फाइन-डायनिंगमध्ये एक प्रमुख नाव बनलं आहे.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com