भीक मागून भिकारी किती पैसे कमावतात याची उत्सुकता अनेकांना असते. असे अनेक भिकारी समोर आले आहेत, जे भीक मागून लखपती झाले आहेत. मात्र भीक मागून खरंच एवढे पैसे कमवता येतात का? असा प्रश्न एका इन्फ्लुएन्सरला पडला. त्यानंतर त्याने स्वत: भीक मागून दिवसभर किती कमाई होते हे तपासण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने एक दिवस भीक मागितली आणि दिवसअखेर मिळालेली कमाई पाहून तो देखील चकीत झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इन्फ्लुएन्सरने मंदिरापासून मॉलपर्यंत आणि ट्रॅफिक सिग्नलपासून रेल्वे स्टेशनपर्यंत सर्वत्र भीक मागितली. अनेकांना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर अनेकांनी मोठ्या मनाने त्याला खिशातून पैसे काढून दिले. मात्र दिवसभर भीक मागून त्याला केवळे 90 रुपये मिळाले. शुभदीप पॉल असं या इन्फ्लुएन्सरचं नाव असून 'moosazindahai' या नावाने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे.
(नक्की वाचा- महाकुंभातील सर्वात सुंदर तरुणीनं कुंभ का सोडलं? रडत-रडत सर्व सांगितलं)
पाहा Video:
सर्वात आधी शुभदीप भिकाऱ्याच्या लूकमध्ये ट्रॅफिक सिग्नलवर गेला. अर्ध्या तापासून अधिक वेळ तिथे फिरुन त्याला काहीच मिळाले नाही.त्यानंतर त्याने जागा बदलली आणि मंदिराबाहेर बसला. जिथे त्याला 10 रुपये मिळाले. यानंतर एका महिलेने त्याला 30 रुपये दिले. यानंतर तो मॉलबाहेर गेला.
तिथे त्याला जास्त पैसे मिळतील अशी आशा होती. तिथे त्याला 20 रुपये मिळाले. शेवटी रेल्वे स्टेशनवर गेला, तिथे त्याला फक्त 10 रुपये मिळाले. अशा प्रकारे शुभदीपने दिवसभर भीक मागून केवळ 90 रुपये कमावले.
(नक्की वाचा- ऋषभ पंतच्या खांद्यावर कुणाचा हात होता? 6 वर्षानंतर उलगडलं 'त्या' फोटोचं रहस्य)
व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट्स आल्या आहेत. एका युजरने लिहिले की, "वाचलास, पोलिसांना पकडलं नाही." दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, "हा अनुभव तुझ्या CV मध्येही टाक." या व्हिडीओला आतपर्यंत 2.5 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 79 हजार लाईक्स मिळाले आहेत.