Ishan Kishan Viral Video: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ईशान किशन (Ishan Kishan News) सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतोय. त्याच्या खेळामुळे, गर्लफ्रेंड किंवा अन्य कोणत्या गोष्टीमुळे नव्हे तर GPS Vestमुळे ईशान (Ishan Kishan Viral Video) चर्चेत आला आहे. खरे तर हे तंत्रज्ञान खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पण नेटकरी याची तुलना महिलांच्या स्पोर्ट्स ब्राशी करत आहेत. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊया सविस्तर...
8 मार्च 2026 रोजी टी-20 वर्ल्ड कप 2026च्या फायनल मॅचमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत भारताने विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. यानंतर मैदानात सर्वजण आनंद साजरा करत होते, यादरम्यान ईशान किशनने आपली जर्सी काढली. जर्सीच्या आतमध्ये त्याने जीपीएस वेस्ट परिधान केले होते. बहुतांश लोकांना हे स्पोर्ट्स वेअर माहिती नसल्याने लोकांनी ईशानची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. ज्यांना जीपीएस वेस्टबाबत माहिती नाही, त्यांना वाटलं की ईशानने स्पोर्ट्स ब्रासारखे काहीतरी परिधान केलंय आणि सोशल मीडियावर अनेकांनी त्याची थट्टा उडवायला सुरुवात केली.
ट्रोलिंगचे मुख्य कारण | Ishan Kishan Troll
ईशान किशनने जर्सीच्या आतमध्ये काळ्या रंगाची घट्ट वेस्ट घातली होती. जर्सी काढताच "ईशानने हे काय घातले आहे?" , "ईशानने स्पोर्ट्स ब्रा का घातली आहे?" असे म्हणत नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवण्यात सुरुवात केली. तर काहींनी कमेंटबॉक्समध्ये जीपीएस वेस्टबाबत माहितीही दिलीय.
(नक्की वाचा: Cricket News: टीम इंडियाचा टी-20 कॅप्टन बदलणार! सूर्याच्या जागी 'हे' 3 खेळाडू शर्यतीत, BCCI चा नवा प्लॅन)
ईशान किशन सोशल मीडियावर ट्रोल | Ishan Kishan Viral Video
ईशानने घातलेले हे स्पोर्ट्सवेअर एक हाय टेक स्पोर्ट्स गॅजेट आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांच्यासह भारतीय क्रिकेट संघातील जवळपास सर्वच खेडाळू या स्पोर्ट्स वेअरचा वापर करतात. याला 'GPS Tracker Vest' किंवा 'Performance Vest' असेही म्हणतात.
(नक्की वाचा: T20 वर्ल्ड कप जिंकला तरी Gautam Gambhir संतापलेलाच? म्हणाला, 'त्या' 30 लोकांशिवाय मला कोणाचं देणंघेणं नाही!)
ईशान किशन व्हायरल व्हिडीओ | Ishan Kishan Viral Video
Photo Credit: PTI And Social Media
GPS Vest म्हणजे काय?GPS Vest हे स्पोर्ट्स वेअर परिधान केल्यानंतर याच्या मागील बाजूस एक GPS Tracker बसवलेले असते. या डिव्हाइसच्या मदतीने खेळाडूची माहिती गोळा केली जाते. उदाहरणार्थ खेळाडू किती वेगाने धावत आहे, सराव अथवा सामन्यादरम्यान खेळाडूने एकूण किती अंतर कापले, हृदयाचे ठोके, शरीरावर किती ताण येते आहे, कॅलरीज् यासह अन्य महत्त्वाच्या गोष्टींचा ट्रॅक ठेवला जातो. सोशल मीडियावर माहितीच्या अभावामुळे ईशान किशन ट्रोल होत असला तरी खेळाडूंसाठी हे एक अतिशय महत्त्वाचे डिव्हाइस आहे.