जाहिरात

Diwali Sweets : दिवाळीसाठी देशातील सर्वात महाग मिठाई, त्या किमतीत iPhone येईल, आकडा हैराण करणारा!

Jaipur News: या मिठाईची किंमत 1.11 लाखांच्या जवळपास आहे.

Diwali Sweets : दिवाळीसाठी देशातील सर्वात महाग मिठाई, त्या किमतीत iPhone येईल, आकडा हैराण करणारा!
  • जयपुर में दिवाली के अवसर पर अंजली जैन के आउटलेट पर स्वर्ण प्रसादम नामक देश की सबसे महंगी मिठाई पेश की गई है
  • स्वर्ण प्रसादम मिठाई में केसर, चिलगोजा और शुद्ध स्वर्ण भस्म का उपयोग होता है जो इसे सुनहरा और आकर्षक बनाता है
  • एक पीस मिठाई की कीमत लगभग तीन हजार रुपये है और इसे ज्वेलरी बॉक्स जैसे भव्य पैकेजिंग में उपलब्ध कराया जाता है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Most expensive sweet in india diwali special : दिवाळी म्हणजे आनंदोत्सव. अंगणात रांगोळी, तोरण. गोडाधोडाचा फराळ. त्यामुळे फराळाची तयारी तर आठवडाभरापासून केली जाते. चकल्या, करंज्या, चिवडा, शंकरपाळे, अनारसे, शेव, नानकटाई यांसह अनेक मिठाई तयार केल्या जातात. दरम्यान दिवाळीनिमित्ताने राजस्थानातील जयपूरमधील एका दुकानात मिळणाऱ्या मिठाईची सर्वाधिक चर्चा होत आहे. 

जयपूरमधील अंजली जैन यांच्या आउटलेटमध्ये स्वर्ण प्रसादम मिठाई तयार करण्यात आली आहे. ज्याची किंमत तब्बल १.११ लाख रुपये किलो आहे. ही देशातील सर्वात महाग मिठाई असल्याचं म्हटलं जात आहे. अंजली जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मिठाईत स्वाद आणि शाहीपणाचा संगम आहे. या मिठाईत चिलगोजा, केसर आणि शुद्ध स्वर्ण भस्माचा वापर करण्यात आला आहे. त्यावर सोनेरी चमक असून एखाद्या सोन्याच्या दागिन्यासारखा लुक आहे. 

Latest and Breaking News on NDTV

अंजली जैन यांनी पुढे सांगितलं, एका तुकड्याची किंमत तब्बल ३ हजार रुपये असून हा पदार्थ ज्वेलरीसारख्या बॉक्समध्ये पॅक केलं जाते. स्वर्ण भस्म हा आयुर्वेदात रोगप्रतिकारक क्षमत वाढविण्यासाठी उपयुक्त मानला जातो. त्यामुळे या मिठाईत स्वादासह आरोग्याची काळजी घेतली जात आहे. 

स्वर्ण भस्म भारत - 1,950 प्रति पीस/ 85,000 प्रति किलो
चांदी भस्म भारत - 1150 प्रति पीस/ 58,000 प्रति किलो

या मिठाईत बदाम, पिस्ता, काजू, अंजीर, ब्लूबेरी, व्हाइट चॉकलेट आणि सॉल्टेड बटर कॅरेमलसारख्या परदेशी पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. काजूकतली, रसमलाई आणि लाडू सारख्या पारंपरिक मिठाईदेखील नव्या रुपात सादर करण्यात आल्या आहेतय 

Latest and Breaking News on NDTV

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com