जाहिरात

नाद करा पण कुणाचा, पिसाळलेला बिबट्या झेपावताच गार्ड थरथरला अन् पुढे..खतरनाक व्हिडीओ पाहिलात का?

बिबट्याला पकडताना किंवा रेस्क्यू करताना काही लोक अशा चूका करतात, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. असाच एका बिबट्याचा खतरनाक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

नाद करा पण कुणाचा, पिसाळलेला बिबट्या झेपावताच गार्ड थरथरला अन् पुढे..खतरनाक व्हिडीओ पाहिलात का?
Leopard Attack Video

Leopard Attack Video : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ चांगले असतात, काही प्रेरणादायी असतात, तर काही व्हिडीओ आश्चर्याचा धक्का देणारे असतात. बिबट्यांच्या व्हिडीओनंही गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. बिबट्याला पकडताना किंवा रेस्क्यू करताना काही लोक अशा चूका करतात, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. असाच एका बिबट्याचा खतरनाक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

या व्हिडीओत पाहू शकता, एक बिबट्या अचानक एका फॉरेस्ट गार्डकडे झेपावतो. त्यानंतर जे काही घडतं ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही लोकांनी या व्हिडीओला मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. तर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. कारण एखादी छोटीशी चूक झाली असती तर, त्या गार्डच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.

नक्की वाचा >> CCTV Video : लोणावळ्याजवळील बोर घाटात 'तो' आला..स्थानिकांसह मुंबई-पुणे हायवेवरून जाणारे प्रवासी भयभीत

इथे पाहा बिबट्याचा भयानक व्हिडीओ

हा व्हिडिओ ‘Ghar Ke Kalesh' नावाच्या X (Twitter) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जाळ्यात बिबट्या अडकवला होता, पण त्याच दरम्यान बिबट्या अचानक फॉरेस्ट गार्डवर झेपावला. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक फॉरेस्ट गार्ड थोड्या अंतरावर पडलेल्या बिबट्याकडे सावधपणे, हळूहळू चालत जात असतो. अचानक, तो बिबट्या उडी मारून त्याच्याकडे वेगाने धाव घेतो.

नक्की वाचा >> IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास काय होईल? कोणाला मिळेल सुपर-8 चं तिकीट?

बिबट्याच्या अनपेक्षित हालचालींमुळे गार्ड घाबरतो आणि मागे वळून जीव मुठीत घेऊन पळतो. बिबट्या थोड्याच अंतरावर थांबतो आणि गुरगुरतो. मात्र, मागे उभे असलेले लोक हे संपूर्ण दृश्य पाहून हसू लागतात, तर गार्ड मात्र भीतीने थरथर कापत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com