Monalisa : माळा विकणारी मोनालिसा आता ज्वेलरी ब्रँडसाठी करणार मॉडेलिंग, चित्रपटानंतर मोठा प्रोजेक्ट हाती

Monalisa Bhosle Mahakumbh 2025 : चित्रपटातील भूमिकेसह मोनिलासाला आणखी एक मोठी संधी मिळाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Monalisa Mahakumbh 2025 : महाकुंभ 2025 मध्ये माळा विकणारी एक मुलगी आपले नक्षीदार डोळे आणि सौंदर्यामुळे एका रात्रीत व्हायरल झाली. तिची लोकप्रियता इतकी वाढली की, तिला कुंभमेळा सोडून मध्यप्रदेशातील आपल्या घरी परतावे लागले. तिला एका चित्रपटात भूमिका मिळाली आहे. याचं चित्रीकरण 12 फेब्रुवारीपासून दिल्लीत इंडिया गेटवर होणार होतं. मात्र काही परवानगी न मिळाल्याने चित्रपटाचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. या चित्रपटासह अनेक ब्रँड तिला ऑफर देत आहेत. अर्थात आपण व्हायरल गर्ल मोनालिसा भोसलेबद्दल बोलत आहोत. सध्या मोनालिसा एका ब्रँडशी जोडली गेली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मोनालिसाचा नवा प्रोजेक्ट...
मोनालिसा महाकुंभमध्ये माळा विकण्याचं काम करीत होती. रुद्राक्षासह विविध पद्धतीच्या माळा विकण्याचं काम करणारी मोनालिसा आता एका ज्वेलरी ब्रँडसाठी मॉडेलिंग करणार असल्याचं समोर आलं आहे. मोनालिसाच्या चित्रपट प्रमोशनचं काम करणाऱ्या टीमने एनडीटीव्हीला सांगितलं की, तिला एका मोठ्या ज्वेलरी ब्रँडने अप्रोच केलं आहे. यासाठी तिला 15 लाख रुपये दिले जात आहे. यासाठी मोनालिसा 14 फेब्रुवारीला या ब्रँडच्या एका कार्यक्रमात सामील होण्यासाठी केरळला जाणार आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Aarushi Pokhriyal Nishank : बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना

मोनालिसाला चित्रपटाची ऑफर...
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया स्टार मोनालिसा हिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. निर्माते सनोज मिश्रा यांनी आपला आगामी चित्रपट 'द डायरी ऑफ मणिपूर'मध्ये प्रमुख भूमिकेसाठी मोनासिलाला ऑफर दिली आहे. मोनालिसा आणि तिच्या कुटुंबीयांनी ही ऑफर मान्यही केली आहे. या चित्रपटात मोनालिसा निवृत्त सैन्य अधिकाऱ्याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. मात्र चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी तीन महिने तिला मुंबईत अभिनयाचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आह. 

Advertisement