Husband-Wife Viral News : आयुष्य कधी,कोणत्या वळणावर कोणाचा खरा चेहरा दाखवेल,हे सांगता येणार नाही.एक व्यक्ती,जो कधी ३० लाखांच्या पगाराचा, 5-5 बंगल्यांचा आणि शानदार जीवनशैलीचा मालक होता, तो आज व्हीलचेअरवर बसून हसत फक्त एवढेच म्हणतोय की,'पैसा काही कामा आला नाही,फक्त माणूसच उपयोगी आला. बहादुरगढचे रहिवासी असलेले हे सीए एका फुटवेअर कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. ब्रेन हॅमरेजमुळे परिस्थिती अचानक बिघडली आणि मेंदूचे सहा मोठे ऑपरेशन करावे लागले.एक वेळ अशी आली की, ते ना बोलू शकत होते,ना लोकांना ओळखू शकत होते.मेमरी लॉसपासून आतापर्यंत त्यांनी खूप काही सहन केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स'वर हा व्हिडिओ @BalkaurDhillon या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय,‘सीए आहे,पाच बंगल्यांचा मालक आहे,तीस लाख रुपये पगार होता..आजारी पडलो तर पत्नीने खोटे बोलून अनाथाश्रमात सोडून पळ काढला.पैसा काही कामाचा नाही,समाजसेवाच कामी येते.' 4 मिनिटे 16 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 63 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
नक्की वाचा >> गौतम गंभीरला गाशा गुंडाळावा लागणार? प्रशिक्षकपदावरून होणार उचलबांगडी? सौरव गांगुलीचं 'ते' विधान खूप चर्चेत
"पत्नीने मला एकटं सोडलं, दोन मुलांनाही..."
त्या व्यक्तीने व्हिडीओत सांगितलं की,"माझी पत्नी मला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने इथे सोडून गेली होती. तीम्हणाली मेदांता चाललो आहोत आणि मला इथे उतरवून पळून गेली. कुटुंबातील लोक भेटायला आले.पण पत्नीने स्पष्ट सांगितले,"मी आता तुला सांभाळू शकणार नाही.आजारपणामुळे कुटुंब दूर गेले तेव्हा वेदना आणखी वाढल्या.पत्नीने एकटे सोडले.दोन मुलं आहेत. ती सुद्धा दूर गेली.
नक्की वाचा >> 'या' दिग्दर्शकाचं अख्ख कुटुंब आहे इंडियन आर्मीत! 'ऑपरेशन सिंदूर'वर बनवणार मोठा सिनेमा,पण फक्त एका अटीवर..
"जेव्हा आलो तेव्हा परिस्थिती खूपच वाईट होती.बोलू शकत नव्हतो.काही समजत नव्हते.लोकांना ओळखू शकत नव्हतो.मग या संस्थेतील लोकांनी मदत केली. माझी काळजी घेतली.जेव्हा माझे स्वतःचे कुटुंब माझ्यापासून दूर जात होते. लोकांनी माझा हात धरला.आवाज परत आला. मेमरीही आता ठीक आहे.एक हात-पाय लकवा झाला आहे. पण मानसिक आरोग्य पूर्णपणे ठीक आहे.आज व्हीलचेअरवर फिरतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मानवतेवर विश्वास परत आला आहे.पैसा नाही.समाजसेवा कामी येते. 3 वर्षांपासून इथे आहे, अत्यंत वाईट अवस्थेत होतो, पण आता ठीक आहे."