
Menstruation Cycle : आपल्या देशात आजही मासिक पाळीबद्दल उघडपणे बोलण्यास अनेक लोक कचरतात. परंतु, त्याचवेळी मासिक पाळीबद्दल जनजागृतीही वाढतीय. या काळात महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी घरातील मंडळी विशेष लक्ष देतात. दक्षिण भारतामध्ये तर क्षिण भारतात, मुलीची पहिली मासिक पाळी आल्यावर मोठा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. कताच एका मुलीने तिच्या पहिल्या मासिक पाळीनिमित्त कुटुंबीयांनी केलेला अनोखा सन्मान सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओ? (Girl menstruation family celebration)
आयुषा नावाच्या या मुलीने तिच्या पहिल्या मासिक पाळीनिमित्त तिच्या कुटुंबीयांनी केलेले सेलिब्रेशन कॅप्चर केले आहे. व्हिडिओमध्ये, ती घराच्या दाराजवळ उभी असताना तिचे कुटुंबीय एक खास विधी करत आहेत. या भावनिक क्षणी आयुषाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात.
सर्वात हृदयस्पर्शी बाब म्हणजे घरातील सर्व पुरुष सदस्य, अगदी वडीलधाऱ्यांपासून लहान मुलांपर्यंत, तिच्या पायांवर पैसे ठेवून तिचा आदर करतात. 'तुमच्या पहिल्या मासिक पाळीचा आनंद तुमचा परिवार अशा प्रकारे साजरा करतो' असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Navratri 2025: नवरात्रीसाठी मोफत स्टिकर्स हवेत? Gemini, ChatGPT नं 5 मिनिटात बनवा, वाचा 10 सोपे प्रॉम्प्ट्स )
सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस (Girl menstruation celebration)
हा व्हिडिओ 14 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या कुटुंबाची प्रशंसा केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, 'संपूर्ण जगासाठी एकच शब्द आहे, 'शिकणे'. ' आणखी एकाने 'हेच एका आधार देणाऱ्या कुटुंबाचे खरे रूप आहे' अशी प्रतिक्रिया दिली.
इथे पाहा Video
'प्रत्येक मुलीला असाच आदर मिळायला हवा' असेही एका वापरकर्त्याने म्हटले आहे. एका वापरकर्त्याने स्वतःचा अनुभव सांगताना लिहिले, 'मला आठवतं, मी नववीत असताना माझ्या आईने मला एका खोलीत बंद राहायला सांगितलं होतं. पण नंतर माझे वडील आले, त्यांनी मला मिठी मारली आणि मी काहीही करू शकते असा विश्वास दिला.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world