VIDEO: मुंबईत राहण्याचा खर्च फक्त 18,000! घरभाडे 11,000.. तरुणीचा हिशोब पाहून नेटकरी चक्रावले

मुंबईमध्ये फक्त 18,000 रुपये पगारात जर कोणी आरामात राहत असल्याचा दावा करत असेल तर विश्वास ठेवणे कठीण आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Viral Video:  मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते. नोकरी, व्यवसायानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक राजधानीमध्ये येतात. पण मुंबईमध्ये राहणे सोपे नाही. मुंबईतील घराच्या किमती,  भाडे आणि दैनंदिन खर्च पाहता चांगल्या पगाराची नोकरी असूनही महिन्याच्या शेवटी चांगलीच चणचण भासते. अशातच मुंबईमध्ये फक्त 18,000 रुपये पगारात जर कोणी आरामात राहत असल्याचा दावा करत असेल तर विश्वास ठेवणे कठीण आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मुंबईतील एका महिलेने आपला मासिक खर्च उघड करून ऑनलाइन खळबळ उडवून दिली आहे. श्रेया गण नावाच्या या कंटेंट क्रिएटरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात तिने सांगितले आहे की, एकटी राहत असताना तिचा दरमहा १७,५०० ते १८,००० रुपयांदरम्यान खर्च होतो. अवघ्या १८००० मध्ये मुंबईत आरामात राहत असल्याचा दावा या तरुणीने केला आहे, ज्यावरुन नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. 

Advertisement

Pune News : पुण्यात पुन्हा भयंकर घडलं; मुठा नदीपात्रातील अंधाराचा घेतला फायदा, 'त्या' भीषण दृश्याने खळबळ

श्रेयाच्या खर्चाची यादी! 

  • - भाडे: रु. ११,५०० (१आरके फ्लॅट)
  • - वीज बिल: रु. ३००-४००
  • - मोबाईल रिचार्ज: रु. ३००
  • - प्रवास (लोकल ट्रेन + ऑटो/कॅब): रु. ५००
  • - किराणा सामान: रु. १,५००-१,८००
  • - ऑनलाइन शॉपिंग: रु. २,०००
  • - इतर खर्च: रु. १,०००
  •  एकूण खर्च अंदाजे १८,००० रुपये आहे.

नेटकऱ्यांमध्ये रंगल्या चर्चा!

व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. अनेक युझर्सना भाड्याचे दर पाहून सर्वाधिक आश्चर्य वाटले. एका युझरने  "ही खरंच मुंबई आहे का? इथे ११,५०० रुपयांमध्ये घर मिळणे कठीण आहे, असं म्हटलं आहे. तर एकाने "मुंबईत १आरके फ्लॅटचे भाडे साधारणपणे २५,०००- ३०,००० रुपये असते." तर आणखी एकाने तुम्हाला इतके स्वस्त घर कुठे मिळाले?" असाही सवाल केला आहे.  केवळ घराचे भाडेच नाही, तर ३००-४०० रुपयांचे विजेचे बिलही लोकांना आश्चर्यचकित करत आहेकाहींच्या मते, हे ठिकाण मुंबईच्या मुख्य भागात नसून ठाणे किंवा पालघरसारख्या जवळच्या भागात असू शकते, जिथे भाडे थोडे कमी आहे.

नक्की वाचा - Pune News :प्राध्यापकाने स्टँम्प पेपरवर लिहिलं मात्र केलं भयंकर; पुण्यात Phd च्या विद्यार्थिनीचा दुर्देवी शेवट