Nihilist Penguin Video : कधी‑कधी ऑफिसमध्ये बसून किंवा ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर तुमच्या मनात येतं ना..बस्स…आता पुरे झालं! गाडी फिरवावी अन् सरळ तिथेच निघून जावं..जिथे ना बॉस असेल, ना नेटवर्क आणि ना जगाची कटकट..एका पेंग्विनने तुमच्या मनात पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण पेंग्विनच्या या व्हायरल व्हिडीओची संपूर्ण जगभरात चर्चा रंगली आहे. कारण अंटार्क्टिकाचा एक ‘बंडखोर' पेंग्विन सध्या संपूर्ण जगाच्या भावना व्यक्त करणारा पोस्टर बॉय बनला आहे. 'द निहिलिस्ट पेंग्विन',असं नाव आता त्या पेंग्विनला इंटरनेटच्या युगात पडलं आहे. म्हणजे असा पेंग्विन ज्याला आता कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. खरंतर हा व्हिडिओ 2007 चा आहे, पण जानेवारी 2026 मध्ये तो अचानक सर्वत्र व्हायरल झाला आहे. यामागचं नेमकं कारण तरी काय आहे? जाणून घ्या..
पेंग्विनचा हा व्हायरल व्हिडीओ 2007 मध्ये समोर आला होता. प्रसिद्ध फिल्ममेकर व्हर्नर हर्झॉग (Werner Herzog) यांच्या एन्काऊंटर्स अॅट द एंड ऑफ द वर्ल्ड (Encounters at the End of the World) या डॉक्युमेंट्रीचा तो एक भाग आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, हजारो पेंग्विन समुद्राकडे जाताना दिसतात. कारण तिथेच ते जगण्यासाठी अन्नाच्या शोधात जातात. पण यातील एक पेंग्विन अचानक दिशाच बदलतो.
नक्की वाचा >> Kalyan News : शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा हृदयविकाराने मृत्यू, पोलिसांच्या एका फोनमुळे..
तिथे ना अन्न आहे,ना पाणी..
बाकी सर्व समुद्राकडे जात असतात पण तो उलट्या दिशेने,म्हणजेच कोरड्या आणि निर्जन पर्वतांकडे चालू लागतो. डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितले आहे की हा मार्ग म्हणजे एक प्रकारचा ‘Death March' (मृत्यूचा प्रवास) आहे, कारण तिथे ना अन्न आहे,ना पाणी. दिल्ली पोलिसांनी तीन दिवस आधी एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, "तुम्ही किती दूर गेले आहात,हे तुम्हाला कोणी विचारत नाही..पण तुम्ही घरी पोहोचले नाहीत, तर तुम्ही सुरक्षीत आहात की नाही? हे मात्र नक्की विचारतात. म्हणजेच हेल्मेट घालण्यातच शहाणपणा आहे."
नक्की वाचा >> Chandra Shani Yog 2026: उद्या चंद्र-शनी ग्रहयोग! या 3 राशीच्या लोकांनी आताच व्हा सावध, काय-काय नुकसान होणार?
2026 मध्ये व्हायरल का झाला व्हिडीओ?
जानेवारी 2026 मध्ये टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर युजर्सने हा व्हिडीओ एडिट करून तो पोस्ट करण्यास सुरुवात केली.या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये विशेष ‘L'Amour Toujours' हे संगीत वापरले गेले,ज्यामुळे हा व्हिडिओ आणखी गंभीर आणि भावनिक वाटू लागला. पेंग्विनचा हा व्हिडीओ एक ट्रेंड बनला आहे. अनेक लोक आपल्या‑आपल्या पद्धतीने व्हिडिओ पोस्ट करत आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय, "भावाने सिस्टमलाच रिजेक्ट केलं.",अन्य एकाने म्हटलं, "हा पेंग्विन नाही, हा मी आहे.."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world