अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला होतो, त्यांचा मूलांक 7 असतो. उदा. 25 जुलै रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक 2+5= 7 असेल. 7 हा अंक गूढ आणि जादुई मानला जातो. अॅस्ट्रो अरुण पंडित आणि भावना उपाध्याय यांनी 7 मूलांक असलेल्या व्यक्तींचा स्वभाव, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे उपाय यावर प्रकाश टाकला आहे.
कसा असतो 7 मूलांकाच्या व्यक्तींचा स्वभाव?
अॅस्ट्रो अरुण पंडित यांच्या मते, 7 मूलांक असलेल्या व्यक्ती अत्यंत गूढ व्यक्तिमत्त्वाच्या असतात. त्यांना गुपिते पोटात ठेवण्यात विशेष कौशल्य असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या कोणालाही त्याची कल्पना येऊ देत नाहीत. या व्यक्ती गोष्टी ताणून धरत नाहीत, कारण त्यांचा कारक ग्रह केतू असतो, जो दीर्घकाळापर्यंत गोष्टी अडकवून ठेवत नाही. अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचे उदाहरण देता येईल; त्यांनी राजीनामा देण्यासाठी कधीही टाळाटाळ केली नाही, जेव्हा वेळ आली तेव्हा बाणेदारपणे राजीनामा देऊन ते निघून गेले.
( नक्की वाचा: श्रावण महिना कधीपासून सुरू होणार? श्रावणी सोमवार किती, शिवामूठ म्हणजे काय? )
जिज्ञासू आणि संशोधक वृत्ती
सी.व्ही. रमण (C.V. Raman) आणि न्यूटन (Newton) यांचाही मूलांक 7 आहे. हा अंक संशोधनाचा मानला जातो. 7 मूलांक असलेल्या व्यक्तींना तंत्र विद्या आणि ज्योतिषशास्त्रात विशेष रुची असते. त्या प्रचंड जिज्ञासू असतात आणि त्यांना अनेक प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी त्या कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न करतात. अरुण पंडित यांनी सल्ला दिला आहे की, जर तुमच्या घरात 7 मूलांक असलेले लहान मूल असेल, तर त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्या, नाहीतर ते मूल बाहेर जाऊन उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करेल आणि काहीतरी चुकीचे शिकून येईल.
अत्यंत कुशाग्र बुद्धी मात्र मोंधळलेला स्वभाव
या व्यक्ती कधीकधी गोंधळलेल्या असतात आणि निर्णय घेताना त्यांना संभ्रम होतो. मात्र, ज्या गोष्टी इतरांना समजत नाहीत किंवा दिसत नाहीत, त्या या व्यक्तींना पटकन दिसतात आणि समजतात. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याचे उत्तम उदाहरण आहे. इतरांना जे कळत नव्हते किंवा दिसत नव्हते, ते धोनीला दिसायचे, ज्यामुळे तो त्वरित रिव्ह्यू घ्यायचा.
( नक्की वाचा: एक चिमूट मीठ पाण्यात मिसळून प्या आणि मग बघा कमाल! फायदे समजल्यावर दररोज कराल सेवन )
काय करावा उपाय?
भावना उपाध्याय यांनी सांगितले की, 7 हा केतूचा क्रमांक असल्याने या व्यक्ती अध्यात्मिक असतात. मंगळ ग्रह अशा व्यक्तींसाठी काही वेळा त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे, या व्यक्तींनी लाल रंगाच्या वस्तूंचे दान करावे. यात रक्तदान (Blood donation) किंवा लाल मिरच्या (Red chillies) दान करणे समाविष्ट आहे. लाल तिखट मंदिरात (Temple) किंवा गुरुद्वारामध्ये (Gurudwara) जिथे अन्नछत्र असते, तिथे दान करावे. 2025 मध्ये, या मूलांकाच्या व्यक्तींना अपघात (Accident) किंवा ऑपरेशन (Operation) होण्याची शक्यता आहे. या वर्षी त्यांना प्रकृतीच्या समस्यांचा (Health issues) सामना करावा लागू शकतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)