'डर के आगे जीत है,' ही जाहिरात तुम्ही नक्की पाहिली असेल. या जाहिरातीमध्ये भीतीवर विजय मिळवून काही तरी खुळचट प्रकार केले जातात. आंध्र प्रदेशातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत देखील सध्या असाच काहीसा प्रकार दिसत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत लोकांनी पोलिसांच्या डोळ्यासमोरच दारुच्या बाटल्या पळवून नेल्या. धक्कादायक प्रकार म्हणजे हा सर्व प्रकार पोलीस फक्त मुकपणे पाहात होते.
काय आहे प्रकार?
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातला हा व्हिडिओ आहे. पोलीस अवैध दारु नष्ट करण्यासाठी जात असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यावेळी बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी कशाचीही पर्वा न करता दारुच्या बाटल्या घेऊन पळण्यास सुरुवात केली. जितक्या दारुच्या बाटल्या हातात येतील तितक्या घेऊन ती लोकं पळत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.
( नक्की वाचा : IAF अधिकाऱ्याची वरिष्ठांविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार, ओरल....साठी बळजबरी केल्याचा आरोप )
गुटुंर पोलिसांनी निवडणुकीच्या काळात ही अवैध दारु जप्त केली होती. या दारुची किंमत जळपास 50 लाख रुपये होती. ही दारु नष्ट करण्याचं पोलिसांनी ठरवलं होतं. त्यासाठी रोड रोलरही त्यांनी आणले होते. त्यानंतरही तिथं उभ्या असलेल्या लोकांना नियंत्रणात आणण्यात पोलिसांना अपयश आलं. त्यांनी पोलिसांच्या समोरस बाटल्या लुटण्यास सुरुवात केली