Viral Video: 7 महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेने Stree 2 सिनेमातील गाण्यावर केला भन्नाट डान्स, लोक म्हणाले Wow

Pregnant Woman Dance Video Viral: सोशल मीडियावर प्रेग्नेंट महिलेच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pregnant Woman Dance Video Viral: प्रेग्नेंट महिलेचा भन्नाट डान्स
Niharika Singh Chadha Insta

Pregnant Woman Dance Video Viral: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. काही व्हायरल व्हिडीओद्वारे नेटकऱ्यांना प्रेरणा मिळते तर काही व्हिडीओंमुळे लोकांचे मनोरंजन होते. यामध्येही सर्वाधिक वेगवेगळ्या स्टाइलचे आणि वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचे डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकतेच सोशल मीडियावर एका महिलेचा डान्स करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. विशेष बाब म्हणजे ही महिला सात महिन्यांची प्रेग्नेंट आहे. 

लोकप्रिय गाण्यावर गर्भवतीचा भन्नाट डान्स

सात महिन्यांची प्रेग्नेंट असलेल्या या महिलेने 'स्त्री 2' सिनेमातील सुपरहिट ठरलेल्या 'आज की रात मजा हुस्न का आँखो से लिजिए' या गाण्यावर सुंदर डान्स केलाय. तिच्या बेली डान्सने नेटकऱ्यांचे मन जिंकलंय. 

सात महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेचा डान्स पाहा VIDEO 

नेटकऱ्यांनी काय म्हटलं?

प्रेग्नेंसीच्या सातव्या महिन्यात महिलेने डान्समधील प्रत्येक स्टेप इतक्या सुंदर पद्धतीने केल्याबाबत नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. काही लोकांनी कौतुक करत काळजी घेण्याचाही सल्ला दिलाय. 

(नक्की वाचा: स्वतःच्याच लग्नात नववधूचा काजोलच्या गाण्यावर धमाकेदार डान्स! पाहणाऱ्यांच्या अंगावर आले शहारे, लग्नच विसरले)

Photo Credit: Niharika Singh Chadha Insta

Photo Credit: Niharika Singh Chadha Insta

Photo Credit: Niharika Singh Chadha Insta

(नक्की वाचा: आधी लाजली, मग बिनधास्तपणे नवरी सासरच्या मंडळींसमोर बेभान होऊन नाचली; VIDEO VIRAL)

रेस्टॉरंटमध्ये नाचताना मुलाचाही व्हिडीओ झाला होता व्हायरल

'स्त्री 2' सिनेमातील अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या 'आज की रात मजा हुस्न का आँखो से लिजिए' या आयटम साँगने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कित्येक लोकांचे या गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल झाले होते. काही महिन्यांपूर्वी सहा ते सात वर्षांच्या मुलाचाही या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.