खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर असलेला पृथ्वी शॉ 9 नोव्हेंबर रोजी 25 वर्षांचा झाला. त्याच दिवशी पृथ्वीची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या संभाव्य टीममध्ये निवड झाली आहे. 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. पृथ्वी शॉचं टीममध्ये पुनरागमन हा चर्चेचा विषय होण्यापूर्वीच तो एका क्रिकेटबाह्य कारणामुळे चर्चेत आला आहे. एका व्हायरल क्लिपमध्ये हा तरुण मुंबईकर एका पार्टीमध्ये डान्स करताना दिसतोय. हा व्हिडिओ त्याच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या पार्टीमधील आहे, असं सांगण्यात येत आहे.
My Man Prithvi Shaw having time which Sachin , Lara , and Sehwag could just dream off 💀💀
— Intent Merchant (@Socrates_hoon) November 9, 2024
.#PrithviShaw pic.twitter.com/Zc1tfsDKf1
Don't know whether he is like Lara, Sachin and Sehwag but he is currently Shakti Kapoor, Gulshan Grover and Prem Chopra.https://t.co/jFdcgqzA2z
— Sunil the Cricketer (@1sInto2s) November 9, 2024
The journey from next Sachin to next Kambli, has multiple milestones #PrithviShaw https://t.co/LFILk9NuBx
— Shyamal Kishore (@shyamalkishore) November 9, 2024
25 वर्षांचा पृथ्वी शॉनं टीम इंडियाकडूनं आत्तापर्यंत 5 टेस्ट, 6 वन-डे आणि एक टी20 सामना खेळला आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा वर्षांपूर्वी पदार्पण केलं होतं. पृथ्वीला त्रिपूराविरुद्ध झालेल्या रणजी ट्रॉफी मॅचमध्ये मुंबईच्या टीममधून फिटनेस आणि शिस्तभंगाच्या कारणामुळे वगळण्यात आले होते.
( नक्की वाचा : KL Rahul Athiya Shetty: केएल राहुल लवकरच होणार बाबा, आथिया शेट्टीनं दिली गुड न्यूज )
मुंबई क्रिकेट टीमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये पृथ्वी नियमितपणे उपस्थित नव्हता. तसंच त्याचं वजनही थोडं जास्त भरलं. त्यामुळे निवड समितीनं पृथ्वीच्या जागेवर दुसऱ्या खेळाडूची निवड केली. 'तुम्ही त्याचा फिटनेस आणि रनिंग बिटवेन द विकेट पाहा. मुंबई क्रिकेट असोसिएशनची उज्ज्वल परंपरा आहे. त्यामध्ये कोणत्याही खेळाडूला अपवाद करता येणार नाही,' अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world