खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर असलेला पृथ्वी शॉ 9 नोव्हेंबर रोजी 25 वर्षांचा झाला. त्याच दिवशी पृथ्वीची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या संभाव्य टीममध्ये निवड झाली आहे. 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. पृथ्वी शॉचं टीममध्ये पुनरागमन हा चर्चेचा विषय होण्यापूर्वीच तो एका क्रिकेटबाह्य कारणामुळे चर्चेत आला आहे. एका व्हायरल क्लिपमध्ये हा तरुण मुंबईकर एका पार्टीमध्ये डान्स करताना दिसतोय. हा व्हिडिओ त्याच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या पार्टीमधील आहे, असं सांगण्यात येत आहे.
25 वर्षांचा पृथ्वी शॉनं टीम इंडियाकडूनं आत्तापर्यंत 5 टेस्ट, 6 वन-डे आणि एक टी20 सामना खेळला आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा वर्षांपूर्वी पदार्पण केलं होतं. पृथ्वीला त्रिपूराविरुद्ध झालेल्या रणजी ट्रॉफी मॅचमध्ये मुंबईच्या टीममधून फिटनेस आणि शिस्तभंगाच्या कारणामुळे वगळण्यात आले होते.